शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-जांभे बसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:40 IST

सातारा : सातारा-जांभे बस सकाळी सव्वासहा वाजता तातडीने सुरू करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. जांभे हे सातारा ...

सातारा : सातारा-जांभे बस सकाळी सव्वासहा वाजता तातडीने सुरू करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. जांभे हे सातारा तालुक्यातील दुर्गम भागातील गाव आहे. सातारा-जांभे ही बस सकाळी सव्वासात वाजता सुरू करावी, तसेच या गावासाठी मुक्कामी बसही सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

..................................................................

फसवणुकीच्या घटनांत वाढ

सातारा : सध्या बहुतांश व्यवहार ऑनलाइन होत असून, यातून मोठ्या प्रमाणावर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे सर्व क्षेत्रामध्ये संगणक क्रांती झाली आहे. गर्दी टाळून संसर्गाला आळा घालण्यासाठी शासनाकडूनही ऑनलाइन व्यवहारासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

................................................

विक्रेत्यांचे अतिक्रमण

सातारा : मकर संक्रांतीचा सण जवळ आल्याने विविध वस्तू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण वाढले आहे. मकर संक्रांतीच्या सणामध्ये वाणवसा, वाण लुटण्याच्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीत लाखो रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे या सणामध्ये व्यसाय करण्यासाठी हंगामी व्यावसायिक सज्ज झाले आहेत.

.........................................................

नागरिकांचा प्रतिसाद

सातारा : येथील भैरोबा डोंगरी ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सातारा-सज्जनगड पदभ्रमंती उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरवर्षी हा उपक्रम डोंगरी ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात येतो. या उपक्रमामुळे पदभ्रमंतीच्या निमित्ताने निसर्गात राहण्याची संधी मिळते.

...................

बळीराजावर संकट

खटाव : खटाव तालुक्‍यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अवेळी पडणाऱ्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील शेतकरी कधी ढगाळ वातावरण, कधी गारठा, तर कधी पाऊस अनुभवत आहेत. त्यामुळे रबी हंगाम धोक्यात आला आहे. अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पोटात गोळा उठत असल्याचे चित्र आहे.

..............

कांदा रोपाचे दर तेजीत

सातारा : मागील तीन ते चार महिन्यांपासून कांद्याला मिळत असलेला दर शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरत असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे. परिणामी कांदा रोप अर्थात तरव्याची मागणी वाढल्यामुळे दर तेजीत आले आहेत. पूर्वी वाफ्यावर होणारी तरवा विक्री आता फुटावर केली जात आहे.

............................

वाहतुकीची कोंडी

सातारा : येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असून, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठेतील रस्ता अरुंद असल्याने दुपारी बारापर्यंत आणि सायंकाळी चारनंतर या रस्त्यावरून चारचाकी वाहनांच्या रहदारीला बंदी घालण्यात आली आहे.

...............

वाहनचालक त्रस्त

सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गावर आणि वाडी येथील टोलनाक्यावर फास्ट टॅग असून, वाहतुकीची कोंडी ही रोजचीच बाब बनली असून, व्यवस्थापन मात्र याकडे डोळेझाक करीत असून, वाहनचालकांकडून संताप व्यक्त होत आहे. फास्ट टॅग यंत्रणा सुरळीत सुरू करण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.

.........................

मोबाइल चोरटे सक्रिय

वाई : शहरात गेल्या काही दिवसांपासून मोबाइल चोरटे सक्रिय झाले आहेत. सध्या भाजीमंडई चोरट्यांच्या रडारवर आहे. भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या वाईकरांना मंडईतूनच मोबाइलविना परतावे लागत आहे.

........