शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग खिंडवाडी-सोनगाव रस्ता बंद करण्यास परवानगीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

शेंद्रे : सोनगाव तर्फ सातारा हद्दीत अस्तित्वात असलेला, परंतु शासनाच्या दोन्ही बांधकाम विभागाकडे अद्याप नोंद नसलेला रस्ता म्हणजे राष्ट्रीय ...

शेंद्रे : सोनगाव तर्फ सातारा हद्दीत अस्तित्वात असलेला, परंतु शासनाच्या दोन्ही बांधकाम विभागाकडे अद्याप नोंद नसलेला रस्ता म्हणजे राष्ट्रीय महामार्ग खिंडवाडी ते सोनगावपर्यंतच्या या रस्त्याची एक वर्षापासून दयनीय अवस्था झाली आहे. दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीने वेळोवेळी विनंती करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे सोनगाव-खिंडवाडी रस्ता बंद करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी सोनगाव ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

हा रस्ता राष्ट्रीय महामार्गालगत सोनगाव हद्दीत उतारावर मोठमोठे खड्डे पडून अत्यंत दयनीय झाला आहे. या रस्त्यावरून लोकांना चालणेही अवघड झाले आहे. रस्त्याची खडी निघाली असल्याने व रस्त्यात मोठमोठाले खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी या रस्त्याच्या या परिसरात अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही प्रशासनास पत्र लिहून दुरुस्ती करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत; परंतु रस्त्याच्या मालकीसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व सातारा जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग या दोघांकडूनही टोलवाटोलवी केली जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता आमच्या अखत्यारित येत नसल्याचे लेखी दिले जात आहे. रस्ता राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्ग यांना जोडणारा असल्याने या रस्त्यावर प्रचंड रहदारी असते. हा रस्ता सातारा औद्योगिक वसाहतीला जोडणारा असल्यामुळे या रस्त्याचा वापर शेंद्रे, सोनगाव, आसनगाव, परळी या परिसरातील औद्योगिक वसाहतीत काम करणारे अनेक लोक करीत असतात.

एक महिन्याच्या आत सार्वजनिक बांधकाम विभाग व सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या दोन्ही मुख्य अभियंत्यांनी संयुक्त चर्चा करून या रस्त्याच्या मालकीसंदर्भात आपली जबाबदारी निश्चित करावी. त्याबाबतचे आदेश द्यावेत, अन्यथा हा रस्ता बंद करण्याची परवानगी मिळाली, असे समजून ग्रामपंचायतीच्या वतीने हा रस्ता रहदारीस बंद करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे सोनगाव ग्रामपंचायतीने दिला आहे.

चौकट

अनेक दिवसांपासून सोनगाव-खिंडवाडी या रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात प्रशासनाकडे लेखी विनंती करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग या रस्त्याच्या मालकी व दुरुस्ती संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याने हा रस्ता रहदारीसाठी बंद करण्याची परवानगी मिळावी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. एक महिन्यात निर्णय न झाल्यास हा रस्ता रहदारीसाठी बंद करणार आहोत, असा इशारा सोनगावचे सरपंच पांडुरंग नावडकर यांनी दिला आहे.