साताऱ्यात इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 10:26 IST2019-04-23T10:25:00+5:302019-04-23T10:26:38+5:30

सातारा येथील गुरुवार बागेजवळ सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामावरून पडून रवी भिकू चव्हाण (वय ३२, रा. सिध्दिविनायक कॉलनी, शाहूपुरी सातारा) या कामगाराचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Death of a worker from Satara building collapse | साताऱ्यात इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू

साताऱ्यात इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू

ठळक मुद्देसाताऱ्यात इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यूअचानक तोल जाऊन इमारतीवरून खाली पडला

सातारा : येथील गुरुवार बागेजवळ सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामावरून पडून रवी भिकू चव्हाण (वय ३२, रा. सिध्दिविनायक कॉलनी, शाहूपुरी सातारा) या कामगाराचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

साताऱ्यातील गुरुवार बागेजवळ एका इमारतीचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या इमारतीवर रवी चव्हाण हा काम करत होता. दोन दिवसांपूर्वी काम करत असताना अचानक तोल जाऊन तो इमारतीवरून खाली पडला.

यात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याला तत्काळ साताऱ्यातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. सुमारे ३० टाके घालण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी दुपारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: Death of a worker from Satara building collapse