सासऱ्याचे प्रेमसंबंध समजल्याने सुनेचा छळ, साताऱ्यातील घटना

By दत्ता यादव | Updated: September 5, 2023 15:45 IST2023-09-05T15:45:17+5:302023-09-05T15:45:35+5:30

पतीनेही जबरदस्तीने अत्याचार करून वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला

Daughter in-law torture after finding out father in law love affair, incident in Satara | सासऱ्याचे प्रेमसंबंध समजल्याने सुनेचा छळ, साताऱ्यातील घटना

सासऱ्याचे प्रेमसंबंध समजल्याने सुनेचा छळ, साताऱ्यातील घटना

सातारा : सासऱ्याचे प्रेमसंबंध समजल्याने सुनेला मारहाण करून तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पती व सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित विवाहिता २५ वर्षांची असून, ती सातारा शहरात राहते. काही दिवसांपूर्वी तिला सासऱ्याच्या प्रेमसंबंधाबाबत माहिती मिळाली. तेव्हापासून पती आणि सासरे तिला मारहाण करू लागले. या प्रकाराबद्दल पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास ती जात असताना पीडित विवाहितेला ‘तू पोलिस स्टेशनला आमच्या विरोधात तक्रार केलीस तर तुझे तुकडे-तुकडे करून तुला मारून टाकीन,’ अशी धमकी दिली. तसेच पतीनेही जबरदस्तीने अत्याचार करून वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. 

पीडित विवाहितेने पती आणि सासऱ्याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी विविध कलमांन्वये दोघांवर गुन्हा दाखल केला. याबाबत महिला पोलिस नाईक सावंत या अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Daughter in-law torture after finding out father in law love affair, incident in Satara