विजेचा धोकादायक खांब बदलला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST2021-06-23T04:25:52+5:302021-06-23T04:25:52+5:30

लोहरवाडी-काळगाव येथे दत्तात्रय बापू लोहार व सदाशिव बापू लोहार यांचे घर आहे. त्यांच्या घराच्या शेजारीच विद्युत वितरणचा विजेचा खांब ...

Dangerous electricity pole replaced! | विजेचा धोकादायक खांब बदलला!

विजेचा धोकादायक खांब बदलला!

लोहरवाडी-काळगाव येथे दत्तात्रय बापू लोहार व सदाशिव बापू लोहार यांचे घर आहे. त्यांच्या घराच्या शेजारीच विद्युत वितरणचा विजेचा खांब आहे. गत दोन वर्षांपासून विजेचा खांब तळात पूर्णपणे गंजून गेला होता. खांबाला मोठे छिद्र पडले होते. गंजून चाळण झालेला हा खांब धोकादायक बनला होता. तो त्वरित बदलावा, अशी मागणी ग्रामस्थातून केली जात होती. या खांबावर सहा कुटुंबांचे वीज कनेक्शन आहेत. त्या सर्वांना धोका निर्माण झाला होता. दत्तात्रय बापू लोहार व सदाशिव बापू लोहार यांच्या घरावर हा खांब पडण्याची शक्यता असल्याने त्यांचे फार मोठे नुकसान होण्याची भीती होती. याबाबत वीज वितरण कंपनीला वारंवार माहिती देण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर हा खांब वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बदलल्यामुळे ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Dangerous electricity pole replaced!