शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

दहिवडीची बाजारपेठ अर्धवेळ उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:36 IST

दहिवडी : फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे त्रिशतक गाठलेल्या दहिवडीमध्ये गेल्या तीन दिवसात कोरोनाचा वेग मंदावला असून, सलग सोळा दिवसांच्या लॉकडाऊननंतर ...

दहिवडी : फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे त्रिशतक गाठलेल्या दहिवडीमध्ये गेल्या तीन दिवसात कोरोनाचा वेग मंदावला असून, सलग सोळा दिवसांच्या लॉकडाऊननंतर सोमवारी दहिवडी शहर अर्धवेळ उघडण्यास माण-खटावचे प्रांताधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याने दहिवडीकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

येथील दुकाने सोमवारपासून सकाळी ११ ते ४ यावेळेत उघडली जाणार आहेत. प्रशासनाकडून वेळेचे निर्बंध घालण्यात आले असून, सर्व ती खबरदारी घेऊन दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवारचा आठवडा बाजार मात्र बंद राहणार आहे. पहिल्या टप्प्यात दहिवडीत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र, दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात दहिवडी शहर हाॅटस्पाॅट बनले होते.

फेब्रुवारी महिन्यात २००पेक्षा जास्त रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण होते. सुरुवातीला २० फेब्रुवारीपासून २२ फेब्रुवारीपर्यंत तीन दिवसांचे लॉकडाऊन होते. त्यानंतर ते दहा दिवसांनी वाढविण्यात आले. त्यानंतर संपूर्ण शहराचे एकाचवेळी रॅपिड सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये १५,९१७ लोकसंख्या असलेली जवळपास ३,००० कुटुंब व शासकीय कार्यालये यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी १५० जणांनी काम केले. दहिवडी शहरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. लक्ष्मण कोडलकर, डाॅ. हेमंत जगदाळे, डाॅ. मयुरी शेळके, डाॅ. विनायक कुलकर्णी, डाॅ. सुनील काशीद यांनी नियोजनबद्ध आखणी केली. वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, आशा, अंगणवाडी सेविका यांची २८ पथके ८ सुपरवायझर मोबाईल व्हॅनसह अद्ययावत केली होती. याकाळात जवळपास १,३०० चाचण्या करण्यात आल्या. व्यापारी, दुकानदार, ज्येष्ठ नागरिक तसेच ज्यांना ताप, खोकला, सर्दी असेल अशा लोकांसाठी सिद्धनाथ मंदिर, चावडी चौक, आंधळी पुनर्वसन शाळा, सावरकर स्मरणिका याठिकाणी तपासणी करण्याची सोय केली होती. त्यामुळे याकाळात वेळीच उपचार मिळाल्याने एकही रुग्ण दगावला नाही. गेल्या तीन दिवसात अवघे सातजण पाॅझिटिव्ह आल्याने कोरोना वाढीचा वेग मंदावल्यामुळेच सोमवारपासून सर्व व्यवहार बंधने पाळत सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

कोट..

सोमवारपासून सकाळी ११ ते ४ यावेळेत दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली असून, शेतकऱ्यांची सुगी लक्षात घेता त्यांच्या मागणीवरून सकाळी ९ ते ५ अशी दुकानांना परवानगी मिळावी, यासाठी आम्ही आग्रही असून, प्रांताधिकारी यांच्याकडे तशी मागणी करणार आहे.

- धनाजी जाधव, नगराध्यक्ष, दहिवडी