शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘आम्ही सारे दाभोलकर’ने सातारा दणाणला

By admin | Updated: August 20, 2015 21:45 IST

निषेध फेरी : नरेंद्र दाभोलकर, शेख काका स्मृतिदिनी तरुणाई रस्त्यावर

सातारा : ‘फुले, शाहू, आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर,’ डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे, या घोषणांनी गुरुवारी सातारा शहर दणाणले. परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात निषेध फेरी काढण्यात आली. या फेरीत तरुणांचा लक्षणीय सहभाग होता.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला गुरुवारी (२० आॅगस्ट) दोन वर्षे पूर्ण झाली. कॉ. गोविंद पानसरे यांचाही खून झाला. या दोन्ही खुनांमागे धर्मांध शक्तींचेच कारस्थान असूनही मारेकऱ्यांचा मागमूस लागलेला नाही. पुरोगामी चळवळीतील अनेकांना जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यांच्यावर हल्ले होत आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.डॉ. दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांचे मारेकरी व त्यामागचे सूत्रधार यांना शोधण्यात आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ सर्व परिवर्तवादी संघटना व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एकजुटीने रस्त्यावर उतरले होते. सकाळी गांधी मैदानापासून निषेध फेरीला सुरुवात झाली. यामध्ये शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते. ‘शाहू, फुले, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर,’ डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे,’च्या घोषणांनी सातारा शहरातील रस्ते दणाणून निघाले. ही फेरी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आल्यानंतर याठिकाणी एमएसडब्ल्यूच्या मुलांनी गाणी म्हटली. येथे रिंगण नाट्याचा प्रयोग झाला. जिल्ह्यातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, डॉ. चित्रा दाभोलकर, डॉ. अनिमिष चव्हाण, डॉ. प्रसन्न दाभोलकर, किशोर बेडकिहाळ, वसंत नलावडे, प्रशांत पोतदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)