साताऱ्यातील सुलेवाडीत सिलेंडरचा स्फोट, आगीत घर बेचिराख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 13:09 IST2023-01-30T13:05:09+5:302023-01-30T13:09:54+5:30

सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र वृद्ध दाम्पत्यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त

Cylinder explosion in Sulewadi in Satara, house burnt in fire | साताऱ्यातील सुलेवाडीत सिलेंडरचा स्फोट, आगीत घर बेचिराख

साताऱ्यातील सुलेवाडीत सिलेंडरचा स्फोट, आगीत घर बेचिराख

दिलीप पाडळे

पाचगणी: जावळी तालुक्यातील सुलेवाडी येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात नागू दगडु पडसरे याचे संपूर्ण घर बेचिराख झाले. यामुळे वृद्ध पडसरे दांपत्याचा आसराच हिरावला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. काल, रविवारी ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल, रविवारी सकाळच्या सुमारास पडसरे याच्या घरात अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या आगीत त्यांचे संपूर्ण घरचं बेचिराख झाले. स्फोट झाला त्यावेळी नागू पडसरे हे ओसरीवर होते. सुदैवाने त्यांना लगेच संतोष रांजणे यांनी बाहेर काढल्याने त्यांचा जीव वाचला. त्यांची वयोवृद्ध पत्नी लीलाबाई कामा निमित्त घराबाहेर होत्या. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.

या स्फोटात जीवितहानी टळली असली तरी पडसरे दाम्पत्यांचा संसार उघड्यावर आला. काल रविवार सुटीचा दिवस असल्याने शासकीय अधिकारी घटनास्थळी फिरकलेच नाहीत. तूर्तास पडसरे दाम्पत्याला शेजारील कुटुंबियांनी मदत केली.

Web Title: Cylinder explosion in Sulewadi in Satara, house burnt in fire