तलवारीने केक कापला; साठ जणांवर गुन्हा पोलीस आक्रमक : फ्लेक्सही पडले कोनाड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:29 IST2018-04-03T00:29:04+5:302018-04-03T00:29:04+5:30
सातारा : शहरातील एका रस्त्याच्या बाजूला मध्यरात्रीच्या सुमारास वाढदिवसाचा केक तलवारीसारख्या धारदार हत्याराने कापून फटाके फोडल्याप्रकरणी अनोळखी सुमारे ६० जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

तलवारीने केक कापला; साठ जणांवर गुन्हा पोलीस आक्रमक : फ्लेक्सही पडले कोनाड्यात
सातारा : शहरातील एका रस्त्याच्या बाजूला मध्यरात्रीच्या सुमारास वाढदिवसाचा केक तलवारीसारख्या धारदार हत्याराने कापून फटाके फोडल्याप्रकरणी अनोळखी सुमारे ६० जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याबाबत फिर्याद देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, दि. ३० च्या मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास राजवाडा ते पोवई नाका रस्त्याच्या बाजूला हा प्रकार झाला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विनापरवाना तलवारीसारख्या धारदार हत्याराने केक कापण्यात आला. तसेच फटाके फोडण्यात आले.याप्रकरणी हवालदार अजित जगदाळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी कमानी हौद परिसरातील सुमारे ६० जणांवर गुन्हा नोंद केला आहे.
साताऱ्यातील दहा फलक हटविले
सातारा शहर पोलिसांनी सोमवारी मोहीम राबवून शहरातील मुदतबाह्य १० फलक काढले. हे फलक नंतर नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सातारा शहरातील पोवई नाका, गोडोली, बॉम्बे रेस्टॉरंट चौक आदी ठिकाणी विविध आशयाचे फलक लावण्यात आले होते. या फलकाची मुदत संपली होती. तरीही हे फलक तसेच होते. त्यामुळे कारवाई करत हे फलक काढण्यात आले. त्यानंतर काढण्यात आलेले हे फलक नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
सातारा शहरातील चौकाचौकात राजकीय नेते मंडळी, दुकानांच्या जाहिराती करण्यासाठी फ्लेक्स लावल्याने शहराचे विद्रूपीकरण होत होते. त्यामुळे हे फलक हटविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांमधून केली जात होती.