अपघातात मृत्यू झालेल्या युवकावर चक्क गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 14:30 IST2019-04-11T14:30:04+5:302019-04-11T14:30:23+5:30

स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवून दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या युवकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात चक्क गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Criminal crime in the accidental youth | अपघातात मृत्यू झालेल्या युवकावर चक्क गुन्हा

अपघातात मृत्यू झालेल्या युवकावर चक्क गुन्हा

सातारा : स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवून दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या युवकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात चक्क गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषीकेश अरविंद शिंदे (वय २२, रा. पुना कॉलेज जवळ, कॅम्प पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, २४ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता ऋषीकेश हा कºहाडहून दुचाकीवरून पुण्याला निघाला होता. शेंद्रेजवळ आल्यानंतर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी दुभाजकास धडकून तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सुमारे दोन महिन्यानंतर पोलिसांनी तपास करून ऋषीकेश हा हयगयीने, निष्काळजीपणाने आणि ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय दुचाकी चालवून स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरला. त्यामुळे त्याच्यावर मोटार वाहन काद्यान्वये सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Criminal crime in the accidental youth