शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तरुणीवरच धमकी दिल्याचा गुन्हा

By admin | Updated: November 6, 2015 23:38 IST

पैसे घेतलेच नाहीत : इस्टेटीसाठी कुभांडचा दावा

सातारा : आपण विवाहित असल्याचे सांगूनही गुजरातमधील तरुणीने आत्महत्येची धमकी देऊन लग्न करण्यास भाग पाडले, असा दावा कोरेगाव तालुक्यातील विक्रम हणमंत किंजले याने केला आहे. वडिलांची इस्टेट मिळविण्यासाठी तिने कुभांड रचल्याचा त्याचा दावा असून, तिला पहिल्या पतीकडून घटस्फोट मिळालेला नसताना तिने दुसरे लग्न केले. आपण तिचे पैसे लुबाडल्याचे तिने सिद्ध करून दाखवावे, असे आव्हानही त्याने दिले असून, ती वारंवार आत्महत्येची धमकी देत असल्याबद्दल त्याने रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे. आपल्याशी लग्न करून किंजले याने आपल्या खात्यातून १८ लाख रुपये काढून पोबारा केल्याचा आरोप संबंधित तरुणीने केला होता. आपल्याकडून एकंदर २५ लाख रुपये घेतल्याचाही तिचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर, या घटनेची दुसरी बाजू समोर आणताना विक्रम किंजले याने सांगितले की, ‘पाच मे रोजी माझे लग्न माण तालुक्यातील मुलीशी झाले आहे. तत्पूर्वी मी गुजरातमध्ये नोकरीस होतो. माझ्या हाताखाली संबंधित तरुणी नोकरीला होती. ओळख वाढल्यानंतर मी माझी काही रक्कम तिच्याकडे विश्वासाने ठेवायला दिली होती. माझे लग्न झाल्यावर मी पुन्हा गुजरातमध्ये गेलो असता, आपल्या वडिलांची इस्टेट आपल्याला मिळणार असून, त्यासाठी मी विवाहित असणे आवश्यक आहे, असे सांगून संबंधित तरुणीने लग्नाची गळ घातली. तिचा पहिला विवाह झाला असून, तिला एक मुलगाही आहे. ती पहिल्या पतीबरोबर राहत नाही. लग्न करणे शक्य नसल्याचे मी सांगताच तिने आत्महत्या करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली आणि जबरदस्तीने लग्न करायला लावले. मी माझीच रक्कम घेऊन गावी आलो असून, तिच्याकडून कोणतीही रक्कम लुबाडलेली नाही.’ त्यानंतरही संबंधित तरुणी वारंवार आत्महत्या करण्याची धमकी देत असून, आपण तिच्याबरोबर गुजरातमध्येच राहायला हवे, अशी गळ घालत असल्याचे किंजले याने सांगितले. ‘आम्ही कोणीही तिला कधीच धमकी दिली नाही; उलट तिला भेटायला गुजरातला गेलो असता विषारी औषध स्वत:च्या मानेवर फवारून सर्वांसमक्ष ती खाली कोसळली. तिला आम्हीच रुग्णालयात दाखल केले होते. ती आमच्या गावी येऊन वारंवार आत्महत्येची धमकी देत असल्याने दि. १२ सप्टेंबर आणि २८ आॅक्टोबर रोजी तिच्याविरुद्ध आम्ही रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे,’ असे त्याने नमूद केले. विशेष म्हणजे त्याचे वय २७ असून, ती ४० वर्षांची आहे. (प्रतिनिधी)