Crime News: कॅनॉलमधून वाहत आला युवकाचा मृतदेह, गळ्यावर वार असल्याने गुढ वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 18:37 IST2022-05-08T18:36:08+5:302022-05-08T18:37:07+5:30
सदर बाजार परिसरातून वाहणार्या कॅनॉलमध्ये युवकाचा गळ्यावर वार असलेला मृतदेह सापडला

Crime News: कॅनॉलमधून वाहत आला युवकाचा मृतदेह, गळ्यावर वार असल्याने गुढ वाढले
सातारा - शहरातील सदर बाजारच्या कॅनॉलमध्ये वाहत आलेला, गळ्यावर वार असलेला मृतदेह आढळला. या सर्व प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. काही तासांपूर्वीच सदर बाजार परिसरातून वाहणार्या पाण्याच्या कॅनॉलमध्ये 30 ते 32 वर्षाच्या युवकाचा मृतदेह वाहत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. यावरून घटनास्थळावर तात्काळ पोलिस दाखल झाले व सदर पाण्यात वाहत आलेल्या युवकाला पोलिसांनी व नागरिकांनी बाहेर काढले.
पोलिसांनी पाण्यातून बाहेर काढलेला सदर युवक मृतावस्थेत सापडला व त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचेही निष्पन्न झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर युवक चार ते पाच तासापूर्वीच वार करुन कॅनॉलमध्ये त्याला फेकले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे हा खून नेमका कोणी केला, या खुनाच्या पाठीमागे नेमका कोणाचा हात याबाबत पोलिस तपास करणार आहेत. वाहत्या पाण्याच्या कॅनलमधून सदर युवकाचा मृतदेह बाहेर काढला असून तो पोस्टमार्टमसाठी सातारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, गावात याचीच चर्चा रंगली आहे.