घराच्या बांधकामाचे साहित्य चोरणार्‍या दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 17:04 IST2020-09-26T17:04:16+5:302020-09-26T17:04:51+5:30

सैदापूर, ता. सातारा येथील एका घराच्या बांधकामासाठी आणलेले २९ हजारांचे लोखंडी बार चोरून नेल्याप्रकरणी तीनजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Crime against two for stealing building materials | घराच्या बांधकामाचे साहित्य चोरणार्‍या दोघांवर गुन्हा

घराच्या बांधकामाचे साहित्य चोरणार्‍या दोघांवर गुन्हा

ठळक मुद्देघराच्या बांधकामाचे साहित्य चोरणार्‍या दोघांवर गुन्हासातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा: सैदापूर, ता. सातारा येथील एका घराच्या बांधकामासाठी आणलेले २९ हजारांचे लोखंडी बार चोरून नेल्याप्रकरणी तीनजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, सिद्धार्थ विजय शिंदे (रा. मल्हारपेठ, सातारा) यांच्या घराचे बांधकाम सैदापुरातील साई दर्शन कॉलनीत सुरू आहे. याठिकाणी बांधकामासाठी आणून ठेवलेले 20 हजारांचे लोखंडी बार संतोष बबन घाडगे, भोपाळ किसन घाडगे ( दोघे रा. सैदापूर) यांनी चोरून नेले.

याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हवालदार जाधव हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Crime against two for stealing building materials