थर्टी फर्स्टला रात्री उशिरा हॉटेल सुरू ठेवणाऱ्या तीन हॉटेलमालकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 05:38 PM2021-01-02T17:38:45+5:302021-01-02T17:40:18+5:30

31st December party CrimeNews Satara -सातारा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश डावलून थर्टी फर्स्टला हॉटेल्स उशिरा सुरू ठेवल्याप्रकरणी सातारा तालुक्यातील म्हसवे येथील हॉटेल मलबार, लिंब फाटा येथील ढाबा शेरे पंजाब आणि शेंद्रे हद्दीतील हॉटेल समरथल या तीन हॉटेलच्या मालकांवर सातारा तालुका पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

Crime against three hoteliers who continued to hotel late at night on Thirty First | थर्टी फर्स्टला रात्री उशिरा हॉटेल सुरू ठेवणाऱ्या तीन हॉटेलमालकांवर गुन्हा

थर्टी फर्स्टला रात्री उशिरा हॉटेल सुरू ठेवणाऱ्या तीन हॉटेलमालकांवर गुन्हा

Next
ठळक मुद्देथर्टी फर्स्टला रात्री उशिरा हॉटेल सुरू तीन हॉटेलमालकांवर गुन्हा

सातारा: जिल्हाधिकार्‍यांचा आदेश डावलून थर्टी फर्स्टला हॉटेल्स उशिरा सुरू ठेवल्याप्रकरणी सातारा तालुक्यातील म्हसवे येथील हॉटेल मलबार, लिंब फाटा येथील ढाबा शेरे पंजाब आणि शेंद्रे हद्दीतील हॉटेल समरथल या तीन हॉटेलच्या मालकांवर सातारा तालुका पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी थर्टी फर्स्टला रात्री उशिरा हॉटेल्स, ढाबे उघडे ठेवून गर्दी जमवू नये, असे आदेश दिले होते. या नियमाचे पालन होते की नाही यासाठी पोलिसांकडून ३१ डिसेंबरच्या रात्री गस्त सुरू होती.

यावेळी म्हसवे, ता. सातारा गावच्या हद्दीतील हॉटेल मलबार रात्री ११.२० वाजता सुरू असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी हवालदार रवींद्र भोरे यांनी फिर्याद दिल्यानुसार हॉटेलचालक मनचूर आमचुंडी गंडी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस नाईक पाटोळे करत आहेत.

दरम्यान, लिंब फाटा येथेही थर्टी फर्स्टला रात्री पाऊण वाजता ढाबा शेर ए पंजाब सुरू असल्याचे पोलिसांना दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी ढाबा मालक दिल प्रीतसिंह हरजितसिंह (वय २२, रा. डेहराडून, उत्तराखंड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तपास हवालदार बागवान करत आहेत.

त्याचप्रमाणे ३१ डिसेंबर होऊन गेल्यावरही पहाटे सव्वातीन वाजेपर्यंत शेंद्रे फाट्यावरील हॉटेल समरथल सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पोलीस नाईक दीपक पोळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हॉटेल मालक राजू बिष्णोई (३६, रा. शेंद्रे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Crime against three hoteliers who continued to hotel late at night on Thirty First

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.