मुलीचा बालविवाह लावणाऱ्या आई-वडिलांसह पतीवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 17:09 IST2022-06-30T17:09:19+5:302022-06-30T17:09:58+5:30

मुलगी अल्पवयीन असतानाही राकेश याने त्या मुलीशी विवाह केला.

Crime against husband along with parents for arranging child marriage of daughter | मुलीचा बालविवाह लावणाऱ्या आई-वडिलांसह पतीवर गुन्हा

मुलीचा बालविवाह लावणाऱ्या आई-वडिलांसह पतीवर गुन्हा

सातारा : अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावणाऱ्या आई-वडिलांसह पतीवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका सोळा वर्षांच्या मुलीचा विवाह घरातील एका खोलीमध्ये मुलीच्या आई-वडिलांनी राकेश अनिल यमकर (रा. आशा काॅलनी, शिवराज पेट्रोलपंपाच्या पाठीमागे, सातारा) याच्याशी लावून दिला. मुलगी अल्पवयीन असतानाही राकेश याने त्या मुलीशी विवाह केला. त्यानंतर वारंवार संबंधित मुलीवर बलात्कार करून तिला गरोदर ठेवले. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घालून संबंधितांवर गुन्हा दाखल केला.

सासू वैशाली यमकर (रा. आशा काॅलनी, शिवराज पेट्रोलपंपाच्या पाठीमागे, सातारा) तसेच मुलीच्या आई-वडिलांवर बालविवाह प्रतिबंध आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस हवालदार कांचन बेंद्रे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत अद्याप कोणालाही अटक झाली नव्हती.

Web Title: Crime against husband along with parents for arranging child marriage of daughter