शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीत लेझर बीम लाईट वापरणाऱ्या ८ जणांवर गुन्हा, पोलिस प्रशासनाचा दणका 

By दीपक देशमुख | Updated: September 20, 2024 15:30 IST

तडीपारी भंग करणाऱ्या ३० जणांवर कारवाई

सातारा : विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी पोलिस प्रशासनाने २० डीजे धारकांविरोधात कारवाईचे प्रस्ताव पाठवले आहेत. तसेच न्यायालयातही खटले दाखल केले आहेत. प्लाझ्मा, बीम लाईट आणी लेझर बीम लाईटचा वापर केल्याप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करुन जप्तीची कारवाई केली आहे. दरम्यान, तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ३० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.गणेशोत्सव कालावधीमध्ये कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार, सातारा तालुका यांनी सातारा शहर पोलिस ठाणे हद्दीतील एकूण ९७ सराईतांवर तडीपारीची कारवाई केली होती. हा तडीपारी आदेश असूनही कारवाई सराईतांनी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा प्रवेश केला. त्यामुळे तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ३० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तसेच गणेशोत्सव कालावधीमध्ये मोठ्या क्षमतेच्या ध्वनीक्षेपण यंत्रणेचा वापर करुन ध्वनी प्रदूषण कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याने एकूण २० डीजे धारकांविरुद्ध उपविभागीय पोलिस अधिकारी सातारा यांच्याकडे प्रस्ताव व न्यायालयाकडे खटले पाठवले आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मिरवणुकीमध्ये ज्यांनी प्लाझ्मा, बीम लाईट आणी लेझर बीम लाईटचा वापर केला आहे अशा ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करुन जप्तीची कारवाई केली आहे.पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्याम काळे, उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार देशमुख, राहुल घाडगे, विश्वनाथ मेचकर, दीपक इंगवले, संदीप पवार यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Policeपोलिस