शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

coronaviurs: कराडमध्ये ६० वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह; १६ संशयितांना विलगीकरण कक्षात केले दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 1:57 PM

कोविड-19 बाधीत रुग्णाच्या चौदा निकट सहवासितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

सातारा  : कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे दाखल करण्यात आलेल्या ७ अनुमानित रुग्णांपैकी  ६० वर्षीय पुरुष  कोरोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तो कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर उर्वरित ६ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधीत ९ निकट सहवासितांचे घशातील स्त्रावाचा नमुनेही निगेटिव्ह आले असल्याचे एन.आय.व्ही. पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

सोमवार दि. ६ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोविड-19 बाधीत रुग्णाच्या चौदा निकट सहवासितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच खासगी रुग्णालयात श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे २ रुग्ण दाखल विलगीकरण कक्षात दाखल केले आहेत. या एकूण १६ जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने  एन. आय. व्ही. पुणे  येथे  पाठविण्यात आले आहेत.

तसेच सोमवारी दुपारी जिल्हा रुग्णालय सातारा  येथे तीव्र जंतु संसर्गामुळे दाखल झालेला २५ वर्षीय अनुमानित अत्यावस्थ झाल्याने रात्री 1 च्या सुमारस त्याला कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असून विलगीकरण कक्षात लागू असलेल्या नियमानुसार उपचार चालू आहेत, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र