CoronaVirus News: कराडमध्ये पाच आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 05:05 IST2020-05-02T05:05:19+5:302020-05-02T05:05:31+5:30

उपजिल्हा रुग्णालयातील पाच आरोग्य कर्मचाऱ्यांसह आणखी दोघांना कोरणाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

CoronaVirus News: Corona to five health workers in Karad | CoronaVirus News: कराडमध्ये पाच आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना

CoronaVirus News: कराडमध्ये पाच आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना

सातारा : कराड तालुक्यात शुक्रवारी आणखी आठ नव्या कोरोनाबाधितांची त्यामध्ये भर पडली आहे. उपजिल्हा रुग्णालयातील पाच आरोग्य कर्मचाऱ्यांसह आणखी दोघांना कोरणाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कराड तालुक्यात वनवासमाची व मलकापूरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. गुरुवारी रात्री वनवासमाची येथील १० वर्षीय मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी आणखी आठ नव्या रुग्णांची भर पडली असून त्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयात काम करणाºया चार नर्स, एक कर्मचारी व मलकापुरातील एका बाळंतिणीसह निकट सहवासीताचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालयात काही दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या बाळंतीन महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र ही बाधा कशी झाली, याचे कोडे अद्यापही उलगडलेले नसताना संबंधित बाळंतीन महिलेच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील चार नर्स व एका कर्मचाºयाला कोरोनाची बाधा झाल्याचे शुक्रवारी समोर आले.

Web Title: CoronaVirus News: Corona to five health workers in Karad