शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

corona in satara :जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच ; तिघांचा मृत्यू अन् ५२ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:24 PM

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, बुधवारी वाई तालुक्यातील आसले येथील ६७ वर्षीय व्यक्तीचा तर पाटण तालुक्यातील जांभेकरवाडीमधील ७० वर्षीय महिलेचा आणि माण तालुक्यातील भालवडी येथील ६२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर ५२ जण नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच ; तिघांचा मृत्यू अन् ५२ जण पॉझिटिव्ह बळींची १२ तर कोरोना बाधितांची संख्या ३९४ वर

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, बुधवारी वाई तालुक्यातील आसले येथील ६७ वर्षीय व्यक्तीचा तर पाटण तालुक्यातील जांभेकरवाडीमधील ७० वर्षीय महिलेचा आणि माण तालुक्यातील भालवडी येथील ६२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर ५२ जण नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडालीय. कोरोना बाधितांचा जिल्ह्याचा आकडा आता ३९४ वर तर बळींची संख्या १२ वर पोहोचली आहे.जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटता तुटेनासी झाली आहे. त्यामुळे प्रशासन अक्षरश: हतबल झाले आहे. गत आठ दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात बुधवारी सकाळी एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाला तर ५२ जण कोरोना बाधित आढळून आले.वाई तालुक्यातील असले येथील ६७ वर्षीय कोरोना बाधित व्यक्ती मुंबई वरून प्रवास करून आली होती. या व्यक्तीचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांना मधुमेहाचाही त्रास होता. तसेच पाटण तालुक्यातील जांभेकरवाडी येथील ७० वर्षीय कोरोना बाधित महिलेचाही मृत्यू झाला.

माण तालुक्यातील भालवडीतील ६२ वर्षी व्यक्तीही मुंबईवरून प्रवास करून आली होती. या व्यक्तीचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात बळींची संख्या आता १२ वर पोहोचली आहे.कोरोना बाधित रुग्णांमध्ये माण तालुक्यातील म्हसवड येथील ४८ वर्षीय पुरुष, तोंडले येथील ५८ वर्षीय पुरुष, भालवडी ६२ वर्षीय पुरुष (मृत्यू), लोधवडे येथील ३४ वर्षीय व २८ वर्षीय महिला. खटाव तालुक्यातील वांझोली येथील ५२ वर्षीय पुरुष व अंभेरी येथील १४ वर्षीय युवक. सातारा तालुक्यातील खडगाव येथील ४८ वर्षीय पुरुष, जिमनवाडी येथील २१ वर्षी युवक , कुस बुद्रुक ४५ वर्षीय महिला. वाई तालुक्यातील आकोशी येथील ५८ वर्षीय पुरुष, आसले येथील ४० वर्षीय पुरुष, मालदपूर येथील २४ वर्षीय पुरुष, देगाव येथील ५५ वर्षीय महिला, सिद्धनाथवाडी येथील २५ वर्षीय पुरुष, धयाट येथील ५२ वर्षीय पुरुष यांचा  समावेश आहे.

पाटण तालुक्यातील धामणी येथील ३५ वर्षीय पुरुष, ६२ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरुष, ३६ वर्षीय पुरुष जांभेकरवाडी ७० वर्षीय महिला, गमलेवाडी येथील ३१ वर्षीय पुरुष, मन्याचीवाडी येथील २० वर्षीय युवक, मोरगिरी येथील ५७ वर्षीय पुरुष व ७२ वर्षीय महिला, आडदेव येथील ३५ वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील अंधोरी येथील ७२ वर्षीय पुरुष, ८ वर्षीय मुलगा, घाटदरे येथील ४७ वर्षीय महिला, पारगाव येथील २७ वर्षीय पुरुष, ६२ वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय महिला, ५० वर्षीय दोन पुरुष, २५ वर्षीय पुरुष, ७८ वर्षीय पुरुष. जावळी तालुक्यातील सावरी येथील ३९ वर्षीय पुरुष, ३२ वर्षीय महिला, ७ वर्षांची मुलगी, केळघर येथील १६ वर्षीय युवक ४४ वर्षीय पुरुष यांचा  समावेश आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील कासरुड येथील २६ वर्षीय पुरुष व १८ वर्षी युवक, देवळी येथील ९ वर्षाचा मुलगा, ४२ वर्षीय पुरुष व एक महिला, गोळेवाडी येथील ४२ वर्षीय महिला. कराड तालुक्यातील खराडे येथील ४५ वर्षीय महिला व ५५ वर्षीय पुरुष, म्हासोली येथील २० वर्षीय युवती, फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथील २१ वर्षीय महिला अशा ५२ जणांचा समावेश आहे.दरम्यान, ९७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत ३९४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १२६ रुग्ण बरे होऊन गेले आहेत. तर १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या २५६ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर