सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, प्रशासनाने केले नियम पाळण्याचे आवाहन 

By दत्ता यादव | Published: December 23, 2023 04:33 PM2023-12-23T16:33:40+5:302023-12-23T16:33:56+5:30

सातारा : कोरोनाचा पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात शिरकाव झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले ...

Corona patient found in Satara District, The administration appealed to follow the rules | सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, प्रशासनाने केले नियम पाळण्याचे आवाहन 

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, प्रशासनाने केले नियम पाळण्याचे आवाहन 

सातारा : कोरोनाचा पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात शिरकाव झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. खटाव तालुक्यातील एका गावात हा रुग्ण आढळला असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली.

सातारा जिल्ह्यात 2020 मध्ये कोरोनाने हाहाकार माजवला होता. यावेळी लॉकडाऊनही करण्यात आल्याने मोठे संकट आले होते. अनेकदा प्रशासनाने अनेक नियमावली जाहीर करत कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पुन्हा एकदा गेल्या काही दिवसापासून कोरोनाने डोके वर काढल्याचे पहायला मिळत आहे.

खटाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका महिलेला कोरोनाची लागण झाली असून तिची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोरोना रूग्ण आढळल्याने लोकांनी भीती बाळगू नये तर सूचनाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी  केले आहे.

Web Title: Corona patient found in Satara District, The administration appealed to follow the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.