सातारा शहरात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 16:17 IST2020-04-29T16:13:52+5:302020-04-29T16:17:34+5:30
सातारा : शहर-उपनगरमध्ये २४ एप्रिलला जिल्ह्यातील दुसरा बाधित रुग्ण सापडला होता. त्याचा १४ दिवसांनंतर मृत्यू झाला. मात्र त्यानंतर सातारा ...

सातारा शहरात कोरोनाचा शिरकाव
ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह क-हाड ग्रामीणमध्येही एक बाधित वाढला; जिल्ह्याचा आकडा ४३
सातारा : शहर-उपनगरमध्ये २४ एप्रिलला जिल्ह्यातील दुसरा बाधित रुग्ण सापडला होता. त्याचा १४ दिवसांनंतर मृत्यू झाला. मात्र त्यानंतर सातारा शहर किंवा तालुक्यात कोणी रुग्ण नव्हता. बुधवारी सातारा शहरात एक बाधित रुग्ण सापडला.
जिल्हा रुग्णालयात ही महिला टेक्निशियन म्हणून कार्यरत आहे. जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये असणा-या सदर बझार येथे एका अपाार्टमेंटमध्ये संबंधित महिला राहत आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य व पोलीस यंत्रणा गतिमान झाली आहे. कºहाड तालुक्यातही एक रुग्ण बाधित झाला असून, जिल्ह्याचा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ४३ वर गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे.