पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर कंटेनरची दुचाकीला धडक; पनवेलमधील एकजण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 16:07 IST2022-04-08T16:06:48+5:302022-04-08T16:07:14+5:30
सातारा : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर सातारा शहराच्या हद्दीत भरधाव कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. मृत पनवेल येथील ...

पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर कंटेनरची दुचाकीला धडक; पनवेलमधील एकजण ठार
सातारा : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर सातारा शहराच्या हद्दीत भरधाव कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. मृत पनवेल येथील रहिवाशी आहे. निशांत आबाजी बाबर (वय ३३, रा. कामोठे सेक्टर, कुसुमकुंज हौसिंग सोसायटी, पनवेल) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काल, गुरुवारी सातारा शहराच्या हद्दीत महामार्गावर अपघात घडला. यामध्ये निशांत बाबर हे ठार झाले. गुरुवारी सकाळी ते सातारा बाजुने कऱ्हाडकडे दुचाकीवरुन (एमएच, ४६, एडब्लू. ०६४०) निघाले होते. सातारा शहराच्या हद्दीत असताना पाठिमागून भरधाव वेगाने कंटेनर (आरजे, १४. जीजी, ५१७४) येत होता. या कंटेनरची समोरील दुचाकीला धडक बसली. यामध्ये निशांत बाबर हे गंभीर जखमी झाले. यात मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अवधूत चंद्रकांत बोडरे (रा. वडगाव हवेली, ता. कऱ्हाड) यांनी तक्रार दिली आहे. त्यानंतर कंटेनर चालक महावीर सिंग सिंकलवार (वय ४३, रा. मोहनूपर, ता. जोरा, जि. मुरेना, मध्यप्रदेश) याच्याविरोधात हलगर्जीपणे मृत्यूचा गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी हवालदार कारळे हे तपास करीत आहेत.