शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस समर्थकांचेही अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:29 IST

कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी मंगळवारी काँग्रेस समर्थकांनीही अर्ज दाखल केले आहेत. हे अर्ज दाखल ...

कराड

: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी मंगळवारी काँग्रेस समर्थकांनीही अर्ज दाखल केले आहेत. हे अर्ज दाखल झाल्याची वार्ता कार्यक्षेत्रात पसरताच उलटसुलट चर्चांना राजकीय वर्तुळात सुरुवात झाली आहे. आता यापैकी किती उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात उतरणार, हे पाहावे लागेल.

कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या एकत्रीकरणासाठी सध्या काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या आघाडीच्या पॅनेलमधून निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी अनेक काँग्रेस कार्यकर्ते इच्छुक आहेत. यातीलच काही इच्छुकांनी मंगळवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याची चर्चा तर होणारच.

अर्ज दाखल केलेल्यांमध्ये सातारा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नाना पाटील, जखिणवाडीचे माजी सरपंच अ‍ॅड. नरेंद्र पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांचे वडील बापूसाहेब मोरे या आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थकांनी रयत पॅनेलमधून हे अर्ज भरले आहेत. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, उपाध्यक्ष नितीन थोरात, सेवा दलाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव मोहिते, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले आदी उपस्थित होते.

- चौकट

दरम्यान, काँग्रसचे नेते अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांचे समर्थक, कराड तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष धनाजी थोरात, पंचायत समितीच्या माजी सदस्या ललिता थोरात, भागवतराव कणसे, सुजित थोरात यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

फोटो

कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना नाना पाटील; नरेंद्र पाटील