शेतकरी विरोधी विधेयकाबाबत काँग्रेसचे आंदोलन : विवेक देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 14:33 IST2020-09-30T14:31:18+5:302020-09-30T14:33:18+5:30

भाजपा सरकारने शेतकरीविरोधी तीन विधेयके मंजूर करून घेतली असून, या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलने केली जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खटाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने, दि. २ आॅक्टोबरपासून विविध प्रकारची आंदोलने केली जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे खटाव तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Congress agitation over anti-farmer bill: Vivek Deshmukh | शेतकरी विरोधी विधेयकाबाबत काँग्रेसचे आंदोलन : विवेक देशमुख

शेतकरी विरोधी विधेयकाबाबत काँग्रेसचे आंदोलन : विवेक देशमुख

ठळक मुद्देशेतकरी विरोधी विधेयकाबाबत काँग्रेसचे आंदोलन : विवेक देशमुखदि. २ आॅक्टोबरपासून विविध प्रकारची आंदोलने

औंध : भाजपा सरकारने शेतकरीविरोधी तीन विधेयके मंजूर करून घेतली असून, या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलने केली जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खटाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने, दि. २ आॅक्टोबरपासून विविध प्रकारची आंदोलने केली जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे खटाव तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, दि. २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने ह्यकिसान-मजदूर बचाव दिवसह्ण पाळला जाणार आहे. या दिवशी तालुक्यातील मुख्यालयात धरणे आंदोलन व मोर्चा काढला जाणार आहे.

राज्यस्तरीय किसान संमेलन दि. १० आॅक्टोबर रोजी राज्यव्यापी किसान संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. तसेच २ ते ३१ आॅक्टोबर रोजी शेतकरी, कष्टकरी, बाजार समितीचे दुकानदार, कामगार यांच्या सह्यांची मोहीम राबविली जाणार आहे.

ही सर्व आंदोलने कोरोनाचे सर्व नियम पाळून केली असणार असून, खटाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले आहे.

Web Title: Congress agitation over anti-farmer bill: Vivek Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.