ऐकावं ते नवलच.. तहसीलदार कार्यालयातून संगणक गेला चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 15:01 IST2021-01-30T15:00:59+5:302021-01-30T15:01:51+5:30
कार्यालय उघडल्यानंतर आज सकाळीच हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर, घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे

ऐकावं ते नवलच.. तहसीलदार कार्यालयातून संगणक गेला चोरी
सातारा : फलटण तहसीलदार कार्यालयातील संगणक अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेले आहेत. तहसील कार्यालय हे अधिकार गुहांमध्ये आहे या अधिकार गृहामध्ये सर्व शासकीय कार्यालये आहेत. तहसील कार्यालयात मध्यरात्री कोणी नसल्याचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी कार्यालयातील महत्त्वाच्या नोंदी असलेले दहा संगणक चोरून नेले आहेत.
कार्यालय उघडल्यानंतर आज सकाळीच हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर, घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. तहसील कार्यालय मधील महत्त्वाचे दस्तावेज संगणकात असून चोरट्याने त्यावरच डल्ला मारल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.