राष्ट्रवादीने पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 17:28 IST2019-09-27T17:27:54+5:302019-09-27T17:28:35+5:30

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने शुक्रवारी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला.

Comprehensive response in the district to the call by the NCP | राष्ट्रवादीने पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद

राष्ट्रवादीने पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद

ठळक मुद्देराष्ट्रवादीने पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसादपोवई नाका आणि राजवाडा परिसरात बंदोबस्त तैनात

सातारा: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने शुक्रवारी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला.

सातारा शहरामध्ये सकाळपासून अनेकांनी आपापली दुकाने उघडली होती. काही ठिकाणी दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद केली होती. राजवाडा, मोती चौक, बसस्थानक परिसरातही काही ठिकाणी दुकाने बंद होती. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी पोवई नाका आणि राजवाडा परिसरात बंदोबस्त तैनात केला होता.

जिल्ह्यात या व्यतिरिक्त पुसेगाव, खंडाळा, पाचवड, औंध, वाई, कºहाड येथेही बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. पाचवड येथे मुख्य बाजार पेठ आहे. ही बाजार पेठही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. ईडीने शरद पवार यांच्या गुन्हा दाखल केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना आहेत. राजकीय द्वेषातून हा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप कार्यकर्त्यांमधून होत आहे.

Web Title: Comprehensive response in the district to the call by the NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.