Satara: एसटीमध्ये महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग, गुन्हा दाखल
By दीपक शिंदे | Updated: September 24, 2024 15:47 IST2024-09-24T15:46:49+5:302024-09-24T15:47:08+5:30
सातारा : कऱ्हाडहून साताऱ्याकडे येणाऱ्या एसटीमध्ये एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात ...

Satara: एसटीमध्ये महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग, गुन्हा दाखल
सातारा : कऱ्हाडहून साताऱ्याकडे येणाऱ्या एसटीमध्ये एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल, सोमवारी (दि. २३) घडली.
राजेंद्र रामचंद्र रसाळ (रा. यशवंतनगर, वाई) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी २१ वर्षांची असून, ती कऱ्हाडमधून एसटीने साताऱ्याकडे येत होती. प्रवासादरम्यान संशयित राजेंद्र रसाळ हा पीडितेच्या शेजारी बसला. यावेळी त्याने पीडितेच्या पाठीला आणि इतर ठिकाणी स्पर्श केला. या प्रकारानंतर पीडित तरूणी सीटवरून उठून पुढच्या सीटवर जाऊन बसली.
मात्र, तरी सुद्धा संशयिताने सीटच्या पाठीमागील बाजूने मोकळ्या जागेतून पायाने तिला स्पर्श केला. सातारा बसस्थानकात एसटी आल्यानंतर पीडित तरुणीने हा प्रकार बसस्थानकातील पोलिस चाैकीत सांगितला. त्यानंतर संबंधितावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सातारा शहर पोलिस ठाण्यातील हवालदार खाडे हे अधिक तपास करीत आहेत.