शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड

By admin | Updated: March 20, 2016 00:25 IST

शिरवळमधील घटना : नऊ जणांवर गुन्हा

शिरवळ : मालट्रक मालकांना भाडे वाढवून देत नाही व पोलिस स्टेशनला तक्रार करता, असे सांगून शिवीगाळ करत ट्रान्सपोर्ट कार्यालयाची तोडफोड केल्याच्या आरोपावरून खंडाळा तालुका वाहतूक असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्षासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिरवळ येथील पंढरपूर फाटा याठिकाणी कंपनीना मालट्रक पुरवठा करणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाचे वाहतूक व्यवस्थापक लाल बाबू गुप्ता हे व इतर कर्मचारी असताना त्याठिकाणी खंडाळा तालुका वाहतूक असोसिएशनचे अध्यक्ष विजय यशवंत नेवसे, उपाध्यक्ष युवराज ढमाळ, पिंटू पीरजादे, गणेश यादव, जाधव व इतर चार ते पाचजण कार्यालयात आले. यावेळी त्यांनी ‘आमच्या संघटनेच्या मालट्रक मालकांना भाडे वाढवून देत नाही व उलट आमच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करता, तुम्ही आत्ता येथे धंदा करायचा नाही,’ असे धमकावत युवराज ढमाळ, विजय नेवसे व पिंटू पीरजादे यांनी हातात दांडके घेऊन कार्यालयातील मधील चार संगणक, दोन प्रिंटर व केबीनची तोडफोड केली. तसेच लाल गुप्ता व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत निघून गेले. या घटनेत संबंधित कार्यालयाचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून निघून जाताना संबंधितांनी या कार्यालयाजवळ असणाऱ्या आणखी एका खासगी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. याबाबतची फिर्याद वाहतूक व्यवस्थापक लाल गुप्ता यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात दिली असून, याप्रकरणी विजय यशवंत नेवसे, युवराज ढमाळ, पिंटू पीरजादे, गणेश यादव यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पोपटराव कदम हे करीत आहे. (प्रतिनिधी)