शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

नारळ फुटले... ढाबे सजले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST

आदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात ग्रामपंचायतीचा बिगुल वाजल्यानंतर उमेदवारी, पॅनेलची नावे निश्चित झाल्यानंतर प्रचाराचे नारळ ग्रामदेवतांच्या ...

आदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात ग्रामपंचायतीचा बिगुल वाजल्यानंतर उमेदवारी, पॅनेलची नावे निश्चित झाल्यानंतर प्रचाराचे नारळ ग्रामदेवतांच्या मंदिरात फुटल्याने निवडणुकीत रंग भरत आहे. त्यामुळे प्रचाराचे नारळ फुटले अन् हॉटेल, ढाबे सजल्याचे चित्र दिसत आहे.

फलटण पश्चिम तालुक्यात प्रत्येक पक्षाचे जिल्हा, तालुका, विभाग प्रमुख आदी पदाधिकारी कार्यशील आहेत. त्यांनी त्यांच्या गावात राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे खर्च करावा लागणार असल्याने काही कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचे रंग भरत असताना प्रचाराचे नारळ फुटल्याने उमेदवार, कार्यकर्ते मतदानासाठी घरोघरी फिरत असताना, त्यांना थकवा येऊ नये म्हणून गावातील उत्साही तरुण उमेदवार कार्यकर्त्यांकडे खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ढाबे, हॉटेलचे आमिष दाखविल्याचे चित्र ओळखून ग्रामपंचायत निवडणुकीत काही कार्यकर्ते चार्ज झाल्याने, गावातील, तालुक्यातील नेत्यांना त्या निवडणुकीत ढाब्यावर जेवण देण्याची मागणी होऊ लागल्याने धाब्यावर गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रचाराचे नारळ फुटले आणि ढाबे, हॉटेल सजले, अशी चर्चा सुरू झाली आहे