पोलीस प्रशिक्षण केंद्राला मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 03:14 PM2021-01-30T15:14:42+5:302021-01-30T15:17:21+5:30

Shambhuraj Desai Karad Satara-कोयनानगर येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या पोलीस प्रशिक्षण उपकेंद्राच्या उभारणीला मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. या उपकेंद्रासाठी ६५ एकर जागा लागणार असून कोयना प्रकल्प व महसुल विभागाकडे वापरात नसलेली जागा मोठ्या प्रमाणात आहे. ही जागा गृह विभागाला हस्तांतरीत होणे गरजेचे आहे.

CM's green signal to police training center | पोलीस प्रशिक्षण केंद्राला मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

पोलीस प्रशिक्षण केंद्राला मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस प्रशिक्षण केंद्राला मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नलकोयनानगरला प्रकल्प : ६५ एकर जागा गृह विभागाकडे होणार हस्तांतरीत

कोयनानगर : कोयनानगर येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या पोलीस प्रशिक्षण उपकेंद्राच्या उभारणीला मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. या उपकेंद्रासाठी ६५ एकर जागा लागणार असून कोयना प्रकल्प व महसुल विभागाकडे वापरात नसलेली जागा मोठ्या प्रमाणात आहे. ही जागा गृह विभागाला हस्तांतरीत होणे गरजेचे आहे.

कोयनानगर येथे गृह विभाग पोलीस प्रशिक्षण उपकेंद्र उभारणार आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रस्तावित प्रकल्पाच्या उभारणीसाठी महत्वाची बैठक व तो उभारणीसाठी जागा पाहणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वत: करून त्याला पसंदी दिली आहे.

यावेळी त्यांच्यासोबत पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, कोयना प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, सहायक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोकराव थोरात, कोयना प्रकल्पाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वैभव फाळके, शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयना दौºयावर आले आसताना त्यांना या बहुउद्देशीय प्रकल्पाच्या प्रस्तावाबाबत माहिती दिली होती. मुख्यमंत्र्यांना ही संकल्पना आवडली. त्यांनी याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. हा प्रकल्प लवकरात लवकर उभारण्यासाठी तातडीने आराखडा तयार करा, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

प्रकल्पासाठी ६५ एकर जागा लागणार आहे. ती जागा कोयना प्रकल्पाने तातडीने द्यावी. म्हणजे हा बहुउद्देशीय प्रकल्प उभारणीसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतुद करता येणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगीतले.

प्रारंभी भाडेतत्वावर सुरू होणार केंद्र

सद्यस्थितीत हा प्रकल्प सुरु करण्यासाठी कोयना प्रकल्पाने रस्ते, वीज, पाणी, इमारती या आवश्यक असणाऱ्या बाबी भाडेतत्वावर गृह विभागाला उपलब्ध करुन द्याव्यात. या वसाहतीची देखभाल व दुरुस्ती गृह विभाग करुन हे केंद्र तात्पुरते चालु करेल. इमारत उभारणी झाल्यावर स्वत:च्या जागेत हे केंद्र स्थलांतरित होईल, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.
 

Web Title: CM's green signal to police training center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.