भाजीच्या पातेल्यात पडल्याने भाजून बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 12:21 IST2021-01-16T12:17:27+5:302021-01-16T12:21:06+5:30

Accident Satara Police- खटाव तालुक्यातील गणेशवाडी येथील चार वर्षीय बालकाचा भाजीच्या पातेल्यात पडल्याने भाजून दुर्दैवी मृत्यू झाला. आदित्य बुरुंगले असे या मृत बालकाचे नाव आहे.

Child dies after falling into vegetable bowl | भाजीच्या पातेल्यात पडल्याने भाजून बालकाचा मृत्यू

भाजीच्या पातेल्यात पडल्याने भाजून बालकाचा मृत्यू

ठळक मुद्देभाजीच्या पातेल्यात पडल्याने भाजून बालकाचा मृत्यूवडूज पोलीस ठाण्यात खबर, तपास पोलिसांकडे

सातारा : खटाव तालुक्यातील गणेशवाडी येथील चार वर्षीय बालकाचा भाजीच्या पातेल्यात पडल्याने भाजून दुर्दैवी मृत्यू झाला. आदित्य बुरुंगले असे या मृत बालकाचे नाव आहे.

याबाबत वडूज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खटाव तालुक्यातील गणेशवाडी येथील आदित्य सतीश बुरुंगले (वय ४) हे बालक बुधवार, दि. ६ रोजी खेळत असताना अचानक भाजीच्या पातेल्यात पडले. या घटनेनंतर आदित्यला तात्काळ पुणे येथे ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा गुरुवार, दि. ७ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. याची खबर पुणे येथील ससून हॉस्टिलमधील वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता लोंबर यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास पोलीस नाईक खाडे करत आहेत.
 

Web Title: Child dies after falling into vegetable bowl