शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कऱ्हाड दौऱ्यावर, 'ढाल-तलवार' कोण- कोण घेणार हातात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 11:43 IST

सातारा जिल्ह्याला खुप मोठा राजकीय इतिहास आहे. या जिल्ह्याला मुख्यमंत्री पदाचा चारदा बहुमान मिळाला आहे

प्रमोद सुकरेकऱ्हाड :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदभार स्विकारल्यानंतर शुक्रवारी प्रथमच कऱ्हाडच्या राजकीय पंढरीत येत आहेत. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत ते त्यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर त्यांचे अनेक शासकीय कार्यक्रम होणार असून दुपारी कऱ्हाडकरांच्यावतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या राजकीय कार्यक्रमात अनेकजण पक्षप्रवेश करणार असल्याचे बोलले जाते. पण प्रत्यक्षात शिंदे गटाची ढाल तलवार कोण कोण हातात घेणार,? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.सातारा जिल्ह्याला खुप मोठा राजकीय इतिहास आहे. या जिल्ह्याला मुख्यमंत्री पदाचा चारदा बहुमान मिळाला आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण हे तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होत. त्यानंतर बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांनीही मुख्यमंत्रीपद भुषविले. तर सध्या सातारा जिल्ह्याचेच सुपुत्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच कऱ्हाडला येत असल्याने त्यांच्या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई स्वत: यामध्ये लक्ष घालून नियोजन करीत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक आढावा बैठका घेतल्या आहेत. या दौºयात कुठलीही कुचराई राहणार नाही, याची दक्षता देसाई घेताना दिसत आहेत.कऱ्हाड दौरा हा ग्रामीण विभागापेक्षा शहराच्या राजकारणात उलथापालथ घडविणारा ठरेल, असे मानले जाते. उद्याच्या जाहिर कार्यक्रमात अनेकजण जाहिर प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते. नक्की कोण कोण बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार,? यावरच कऱ्हाडची राजकीय परिस्थिती नेमकी काय होईल, याचा अंदाज बांधता येईल.कऱ्हाड येथील यशवंत विकास आघाडीचे प्रमुख राजेंद्र यादव यांनी या नागरी सत्कारासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या आघाडीचे नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेत उद्या प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. पण आघाडीचे सर्व माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार का? हे कळण्यासाठी थोडे थांबावेच लागेल.

शंभूराज देसाईंची छापकऱ्हाडनजीकच्या पाटणचे आमदार, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते, पालकमंत्री शंभूराज देसाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. चार महिन्यापुर्वी झालेल्या सत्ता संघर्षातही देसाई़ंची महत्वाची भुमिका राहिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर पालकमंत्र्यांची छाप दिसत आहे.

अर्धा डझनावर मंत्र्यांची उपस्थितीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात अर्धा डझनावर मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, रोजगार मंत्री दादा भुसे आदी या दौºयात येणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्व आहे.

... हा विकासाचा सेतू!पुल म्हणजेच 'सेतू'. सेतू हा नदीपात्राच्या दोन काठांना जोडणारा दुवा असतो. कऱ्हाड तालुक्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर केलेल्या दोन पुलांचे भुमीपुजन होणार आहे. आता दोन पक्षाचे हे नेते विकासाचाच सेतू बांधत आहेत, असेच म्हणायचे का?

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदे