मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साताऱ्यात आगमन, दोन दिवस दरे गावी राहणार

By नितीन काळेल | Published: August 10, 2023 05:12 PM2023-08-10T17:12:42+5:302023-08-10T17:23:27+5:30

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसासाठी महाबळेश्वर तालुक्यातील दरे या गावी आले आहेत. गुरुवारी सायंकाळी पावणे पाचच्या ...

Chief Minister Eknath Shinde arrival in Satara, will stay in the village for two days | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साताऱ्यात आगमन, दोन दिवस दरे गावी राहणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साताऱ्यात आगमन, दोन दिवस दरे गावी राहणार

googlenewsNext

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसासाठी महाबळेश्वर तालुक्यातील दरे या गावी आले आहेत. गुरुवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास त्यांचे साताऱ्यातील सैनिक स्कूल मैदानावर हेलिकॉप्टरने आगमन झाले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाव महाबळेश्वर तालुक्यात दरे तर्फ तांब आहे. वर्षातून ते अनेकवेळा गावी कुटुंबीयांसह येतात आताही मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसासाठी गावी आलेले आहेत. सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर हेलिकॉप्टर त्यांचे आगमन झाले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील तसेच प्रशासनातील जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते. साताऱ्यातून मुख्यमंत्री दरे गावाकडे वाहनाने जाणार आहेत. 

Web Title: Chief Minister Eknath Shinde arrival in Satara, will stay in the village for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.