शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींच्या जयघोषात दरबार मिरवणूक !

By admin | Updated: April 22, 2015 00:30 IST

‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर : हजारोंची उपस्थिती; ढोलताशे, झांजपथक, मर्दानी खेळांचा सहभाग

कऱ्हाड : फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण, ढोलताशांचा दणदणाट, ‘जय शिवाजी, जय भवानी’चा गजर आणि झांज पथकाचा ठेका अशा उत्साही वातावरणात मंगळवारी सायंकाळी शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची दरबार मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारो युवकांनी केलेल्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पारंपारिक पोषाखाबरोबरच भगवे फेटे परिधान करून मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले युवक, युवती व महिला उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू एकता आंदोलनच्यावतीने मंगळवारी सायंकाळी दरबार मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शहरातील सोमवार पेठेमध्ये असलेल्या पांढरीचा मारूती मंदिरपासुन या मिरवणुकीला प्रारंभ झाला. तेथुन कन्या शाळा, चावडी चौकमार्गे ही मिरवणुक मुख्य बाजारपेठेतून दत्त चौकाकडे मार्गस्थ झाली. लेझीम पथक, झांज पथक, ढोल ताशे पथक मिरवणुकीच्या अग्रभागी होते. यावेळी चौकाचौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ऐतिहासिक पोषाख परिधान करून घोड्यावर स्वार झालेले शस्त्रधारी मावळे, युध्दकलेची प्रात्यक्षिके तसेच चित्तथराथरक कसरती उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या. गडांच्या प्रतिकृती काही चित्ररथांमध्ये तयार करण्यात आल्या होत्या.या मिरवणूकीत २५ पेक्षा जास्त सार्वजनिक मंडळांनी आपल्या देखाव्यांचे रथ सहभागी केले होते. पाटण कॉलनीतील शिवाजी गणेश क्रीडा मंडळ व श्री साई दत्त नवरात्र उत्सव मंडळांतर्फे दरबार देखावा, प्राणी वाचवा असा संदेश देणारा देखावा सादर करण्यात आला. चावडी चौक, आझाद चौक, पावसकर गल्ली, मंडई परिसर, नुतन मराठी शाळा परिसर, महिला महाविद्यालय, पे्रमलाताई चव्हाण तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसर, प्रीतिसंगम बाग परिसर आदी ठिकाणच्या सार्वजनिक मंडळांकडून आकर्षक देखावे मिरवणूकीमध्ये सहभागी करण्यात आले होते. मिरवणुक मार्गावर ठिकठीकाणी रांगोळी काढण्यात आली होती. रोषणार्इंनी सजवण्यात आलेले देखाव्याच्या रथांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. (प्रतिनिधी)पताकांनी वाढविली शोभादत्तचौकातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हजारो शिवसैनिकांनी अभिवादन केले. मुख्य रस्ते आकर्षक भगव्या रंगाच्या पताकांनी सुशोभीत करण्यात आले होते. उंच मुर्तींनी वेधले लक्ष मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांसह श्री रामाची सुमारे वीस फुट उंच मुर्ती सहभागी करण्यात आली होती. या मुर्तींनी उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच पालखीचे दर्शन घेण्यासाठीही नागरीकांनी गर्दी केली होती. मिरवणुकीत गजा ढोल पथकही सहभागी करण्यात आले होते. या पथकाच्या दणदणाटाने परिसर दणाणून सोडला.