शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची तपासणी सुरू

By admin | Updated: February 2, 2015 23:57 IST

पशुधन विभागाच्यावतीने ढाकणीत लसीकरण मोहीम

म्हसवड : ‘दुष्काळातून वाचली; त्यांना कुत्री चावली’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली. ‘लोकमत’च्या या दणक्यामुळे पशुधन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येऊन ढाकणी, ता. माण येथील शेतकऱ्यांच्या जनावरांची तपासणी तालुका पशुधन विकास अधिकारी व पथकाने करून लसीकरण मोहीम हाती घेतल्याने ढाकणी येथील पशुधनाचे जीव वाचणार असल्याने शेतकऱ्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत. शनिवार, दि. ३१ जानेवारीच्या अंकात दुष्काळातून वाचली; त्यांना कुत्री चावली’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. ढाकणी येथील श्ोतकऱ्यांची अनेक जनावरे दगावल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. जनावरे दगावण्यास सुरुवात झाल्यावर संबंधित शेतकऱ्यांनी वडजल पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना सर्व घटनेची माहिती दिली. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत ठरावही केला, तरी पशुधन विभागाने दुर्लक्ष केल्याने जनावरे दगावण्याचे सुरूच होते; परंतु शनिवारच्या ‘लोकमत’च्या अंकात बातमी प्रसिद्ध झाली. पशुधन विभागाचे अधिकारी खडबडून जागे होऊन तालुका पशुधन अधिकारी डॉ. मनीषा नेटके व अन्य दहा पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या पथकाने शनिवारीच ढाकणी गावाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या जनावरांची तपासणी केली. त्यानंतर दगावलेली जनावरे पिसाळलेले कुत्रे चावल्यामुळे दगावली असल्याचा निष्कर्ष या पथकाने काढला. यानंतर ढाकणी येथील शेतकऱ्यांच्या सुमारे १५०० जनावरांपैकी कुत्रे चावल्याची शक्यता असणाऱ्या जनावरांना रेबीज लस देण्यात आली, तर अन्य जनावरांना घटसर्प लस देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एन. डी. धिवार व कर्मचारी लसीकरण करत असून, येत्या दोन दिवसांत लसीकरण पूर्ण होणार आहे. (वार्ताहर)‘लोकमत’च्या वृत्तामुळे आमच्या लाखमोलाच्या पशुधनाचे प्राण वाचण्यास मदत झाली. त्यामुळे मी ग्रामस्थांच्या वतीने ‘लोकमत’ला धन्यवाद देत आहे.- प्रकाश ओंबासे, ग्रामस्थ ढाकणी