शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

चाफळ पोलीस बंधूंना कोणी घर देता का घर..?, खासगी पडवीचा घ्यावा लागतोय आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 5:28 PM

तालुक्याला शंभूराज देसाईंच्या रूपाने गृह राज्यमंत्रिपद मिळूनही कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी आसरा मिळाला नाही, ही मोठी शोकांतिका मानली जात आहे

हणमंत यादवचाफळ : चाफळ येथील पोलीस कर्मचाऱ्यांची अवस्था ‘न घर का, ना घाट का’ अशी काहीशी होऊन बसली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय नसल्याने कर्मचाऱ्यांना श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या भक्त निवासस्थानाचा आसरा घ्यावा लागत आहे. तालुक्याला शंभूराज देसाईंच्या रूपाने गृह राज्यमंत्रिपद मिळूनही कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी आसरा मिळाला नाही, ही मोठी शोकांतिका मानली जात आहे. शासनाने येथील कर्मचाऱ्यांना सुसज्ज निवासस्थान बांधण्यासाठी निधी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.चाफळ विभागात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी चाफळला साधारण ४०-४५ वर्षांपूर्वी पोलीस आऊट पोस्टची मंजुरी देत एका पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक शासनाने येथे केली होती. हे आऊट पोस्ट येथील एका दानशूर व्यक्तीच्या दात्रृत्वातून खासगी घरामध्ये सुरू करण्यात आले होते. त्यानंतर चाफळला पोलीस दूरक्षेत्राचा दर्जा मिळाला व दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. कालांतराने यात फक्त एका कर्मचाऱ्याची वाढ होऊन सध्या तीन कर्मचारी येथील कार्यभार सांभळत आहेत. त्यांचीही अवस्था ‘न घर का, ना घाट का’ अशी काहीशी होऊन बसली आहे.राहण्याची सोय नसल्याने कर्मचाऱ्यांना श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या भक्त निवासस्थानाचा आसरा घ्यावा लागत आहे. चाफळला पोलीस दूरक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर स्वतंत्र जागेची व इमारतीची उणीव भासू लागली होती. यावेळी पुन्हा येथील दिवंगत आत्माराम गादेकर यांनी स्वमालकीची प्रशस्त जागा पोलीस दूरक्षेत्र बांधण्यासाठी दिली आहे. आज याच जागेतील पोलीस दूरक्षेत्राची इमारत मोडकळीस आली आहे. इमारतीसह कर्मचारी निवासस्थानाची मोठी पडझड झाली आहे. त्यामुळे याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ या म्हणीप्रमाणे होऊन बसली आहे.

सध्या याठिकाणी एक पोलीस उपनिरीक्षक व दोन जवान कार्यरत आहेत. यातील उपनिरीक्षक हे मल्हारपेठ पोलीस ठाण्यातच जास्त वेळ असतात. राहिलेल्या दोन कर्मचाऱ्यांपैकी एक सुटीवर गेला, तर एकाच कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. यातच विभागातील नेत्यांकडून वारंवार हस्तक्षेप होऊन राजकीय दबाव टाकला जात असल्याने काम करतानाही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ‘भीक नको; पण कुत्रं आवर’ म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. शासन व शासनकर्त्यांनी याठिकाणी कर्मचारी संख्या वाढवून इमारत बांधकामासाठी निधी देण्याची मागणी जोर धरत आहे.

चाफळ येथील पोलीस दूरक्षेत्र इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव तयार करून पाठविला आहे. या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. पोलीस खात्याच्या वरिष्ठांनी चाफळला कर्मचारी संख्या वाढवून द्यावी. -भरत साळुंखे, अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना, पाटण तालुका

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिसHomeसुंदर गृहनियोजन