भुजबळांनी मुक्ताफळे उधळू नयेत, राईचा पर्वत करतायत; विखे-पाटलांची पृथ्वीराज चव्हाणांवरही टीका

By प्रमोद सुकरे | Published: November 28, 2023 09:02 PM2023-11-28T21:02:36+5:302023-11-28T21:04:06+5:30

पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणा संदर्भात सत्ता गेल्यानंतर शहाणपण दाखवू नये

Chagan Bhujbals should not scatter fruits; Vikhe-Patil also criticized Prithviraj Chavan | भुजबळांनी मुक्ताफळे उधळू नयेत, राईचा पर्वत करतायत; विखे-पाटलांची पृथ्वीराज चव्हाणांवरही टीका

भुजबळांनी मुक्ताफळे उधळू नयेत, राईचा पर्वत करतायत; विखे-पाटलांची पृथ्वीराज चव्हाणांवरही टीका

लोकमत न्यूज नेटवर्क

कराड : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे. परंतु, छगन भुजबळ राईचा पर्वत करत आहेत. ते  ज्येष्ठ नेते असून आरक्षणावरून अशा प्रकारची वक्तव्ये करणे दुर्देव आहे. त्यांनी आपली मुक्तातफळे उधळणे थांबवावे, असा सल्ला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणा संदर्भात सत्ता गेल्यानंतर शहाणपण दाखवू नये, असा टोलाही त्यांनी यावेळी लागवला.

मुंबईहून कोल्हापूरला जाताना कराड येथे एका हॉटेलवर थांबले असताना पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

मंत्री विखे-पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे. याबाबत कोणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. याबाबत मनोज जरांगे-पाटील यांनाही आम्ही लेखी स्वरूपात आश्वासन दिले आहे.  मराठा समाज मागत असलेले आरक्षण हा त्यांचा अधिकर आहे. सरकार त्याच्यावर सकारात्क विचार करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, भुजबळ विनाकरण राईचा पर्वत का करत आहेत? माहिती नाही. मात्र, त्यांनी मुक्तफळे उधळणे थांबवावे.

दुध दराच्या आंदोलनाबात विचारले असता मंत्री विखे-पाटील म्हणाले, दूधाला प्रति लिटर किमान ३४रुपये दर दिला पाहिजे.  काही दूध संघ सरकारचा आदेश पाळत नसल्याच्या तक्रारी आहेत. महाराष्ट्रात सध्या ३० टक्के दुधात भेसळ आहे. हे तात्काळ थांबवणे गरजेचे आहे. दुधाच्या भावाबाबत खासगी दुध संघ ऐकणार नसतील, तर त्यांचे परवाने रद्द करावे लागतील, असे ते यावेळी म्हणाले.

... सत्ता गेल्यानंतर शहाणपण काय कामाचे

राज्यात आमचे सरकार असते, तर मराठा समाजाला आरक्षण दिले असते, या पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर वक्तव्यार बोलताना, मंत्री विखे-पाटील म्हणाले, दुर्दैवाने महाराष्ट्रात झालेली काँग्रेसची पिछेहाट व वाताहतीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच आघाडीचे सरकार गेले असून त्यांनीच सरकार घालवण्याचे काम केले आहे. त्यांची सत्ता गेल्यानंतर शहाणपण दाखवणे, यात काही तथ्य नाही.

Web Title: Chagan Bhujbals should not scatter fruits; Vikhe-Patil also criticized Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.