PHOTOS : शुबमन आणि रिद्धिमा लग्न करणार? अभिनेत्रीनं सोडलं मौन, तिचं धक्कादायक उत्तर

ridhima pandit shubman gill marriage : रिद्धिमा पंडीत आणि शुबमन गिल लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा पंडीत आणि भारतीय संघाचा खेळाडू शुबमन गिल लग्न करणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अशातच अभिनेत्रीने याप्रकरणी मौन सोडले असून, तिची भूमिका स्पष्ट केली.

लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम देताना रिद्धिमाने अफवा न पसरवण्याचे आवाहन केले. याशिवाय मी गिलला ओळखत देखील नसल्याचे तिने सांगितले.

रिद्धिमाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चुकीची बातमी पसरवली जात असल्याचे म्हटले. रिद्धिमा आणि गिल येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा सुरू होती. पण, तिने आता या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

रिद्धिमा म्हणाली की, मी शुबमन गिलला ओळखत देखील नाही. त्यामुळे लग्नाची गोष्ट तर फार दूर आहे. अनेक पत्रकार मला फोनकरून याबद्दल माहिती विचारत आहे.

तसेच सर्व पत्रकार मला माझ्या लग्नाबद्दल विचारणा करत आहेत. पण मी आताच लग्न करणार नाही. जीवनात अशी वेळ येईल तेव्हा मी स्वत:हून याबद्दल माहिती देऊन. मात्र तूर्त जी चर्चा सुरू आहे त्यात काही तथ्य नाही.

रिद्धिमा पंडीत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले असून, ती बिग बॉसमध्ये देखील दिसली आहे.

दुसरीकडे, शुबमन गिल राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघाचा भाग आहे. तो टीम इंडियासोबत अमेरिकेत आहे. तिथे ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा थरार रंगला आहे.

आयपीएल २०२४ मध्ये संघर्ष करताना दिसलेला गिल विश्वचषकाच्या संघाचा भाग नाही. त्याला राखीव खेळाडू म्हणून संधी मिळाली आहे.