शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: लग्न समारंभाची लगबग, अन् चोरट्याने वधूच्या रूममध्येच मारला डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 17:29 IST

रोख रक्कम व सोन्याचे दागिने केले लंपास

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील पारगावच्या हद्दीमधील मंगल कार्यालयात लग्न समारंभावेळी वधूच्या रूममधून चोरट्याने रोख रक्कम व सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास केली. यामधील दोन तोळे चौदा ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाइल व रोकड असा १ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. भरदिवसा लग्न समारंभ कार्यक्रमामध्ये चोरीचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, संशयित चोरटा हॉलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.याबाबतची घटनास्थळावरुन व पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पारगाव, ता.खंडाळा येथील एका नामांकित हाॅलमध्ये पुणे जिल्ह्यातील शिंद, ता.भोर, जि.पुणे येथील सुतार यांच्या मुलीचा व सातारा जिल्ह्यातील शामगाव, ता.कराड येथील धर्माधिकारी यांच्या मुलाचा लग्न समारंभ शुक्रवार दि.१० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, हाॅलमधील वधूला देण्यात आलेल्या रुममध्ये एका बॅगेमध्ये नवरीमुलीचे मोबाइल, सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा मुद्देमाल ठेवला होता. रूममध्ये वधूची आई साहित्य देवाण-घेवाण करण्याच्या गडबडीत असताना अज्ञात चोरट्यांने संधी साधत रूममध्ये प्रवेश केला. रूममधील रोख १७ हजार, ४८ हजारांची १२ ग्रॅमची सोन्याची चेन, २० हजारांचे अर्धा तोळ्याचे झुमके, वीस हजारांचे दोन सोन्याची कर्णफुले, वीस हजारांचे अर्धा तोळे सोन्याच्या दोन वाट्या, आठ हजारांच्या दोन सोन्याच्या नथ, पाच हजारांचा मोबाइल असा १ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली बॅग चोरट्याने लंपास केला. दरम्यान, घटनास्थळी पोलीस निरीक्षक महेश इंगळे, पोलिस अंमलदार सुरेश मोरे, जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली.याबाबतची खबर सूरज सुतार यांनी खंडाळा पोलीस स्टेशनला दिली असून तपास पोलिस अंमलदार सुरेश मोरे करीत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस