शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकरीच्या आमिषाने तरुणाची तब्बल १० लाखांची फसवणूक, आरोग्य उपसंचालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 20:15 IST

आणखी एकाचा समावेश : सरकारी नोकरीच्या आमिषाने १० लाखांची फसवणूक

फलटण (जि. सातारा) : सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल १० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामकिसन गंगाधर ध्यार व पुण्याचे आराेग्य उपसंचालक डॉ. भगवान अंतू पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक हणमंत गावडे (वय २४, रा. जावली, ता. फलटण) या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्या तक्रारीनुसार, ऑक्टोबर २०२५ दरम्यान रामकिसन गंगाधर ध्यार (रा. सरकारी निवासस्थान, आरोग्य केंद्र, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) व डॉ. भगवान अंतू पवार यांनी फिर्यादीस आपण डीएमईआर अंतर्गत फार्मासिस्ट पदावर सरकारी नोकरी लावून देऊ, असे सांगून विश्वासात घेतले.सरकारी नोकरी मिळेल या आशेने फिर्यादीने आरोपींच्या सांगण्यावरून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने १० लाख रुपये संबंधितांकडे वर्ग केले. मात्र, रक्कम घेतल्यानंतरही फिर्यादीस सरकारी नोकरी मिळाली नाही. याबाबत वारंवार विचारणा करूनही आरोपी टाळाटाळ करू लागले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी १६ जानेवारी २०२६ रोजी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून, आर्थिक व्यवहार, बँक खात्यांची माहिती व डिजिटल पुरावे तपासण्यावर पोलिसांचा भर आहे.