शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंसह ८० धारकऱ्यांवर गुन्हा दाखल; कऱ्हाड पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 11:59 PM2021-07-05T23:59:49+5:302021-07-06T00:02:03+5:30

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा ठपका

Case filed against 80 including Sambhaji Bhide for violating norms | शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंसह ८० धारकऱ्यांवर गुन्हा दाखल; कऱ्हाड पोलिसांची कारवाई

शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंसह ८० धारकऱ्यांवर गुन्हा दाखल; कऱ्हाड पोलिसांची कारवाई

googlenewsNext

कऱ्हाड : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करीत जमाव जमवून कोरोनाच्या निर्देश व आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे-गुरुजी यांच्यासह सुमारे ८० धारकऱ्यांवर कऱ्हाड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा जमाव जमवून रॅली काढली आणि मंदिरात प्रवेश बंदी असतानाही मंदिर उघडून प्रवेश केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यातील हवालदार प्रशांत पाटील यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे, सागर आमले, अजय पावस्कर, केदार डोईफोडे, प्रवीण माने, गणेश कापसे, रणजित पाटील, सुदर्शन पाटसकर यांच्यासह अन्य धारकऱ्यांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आषाढी वारीवर राज्य शासनाने निर्बंध घातले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर पायी दिंडी सोहळा काढण्यास मनाई करण्यात आली असून वारीला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या बंडातात्या कऱ्हाडकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले आहे. शासनाने बंडातात्या कऱ्हाडकर यांच्यासह वारकऱ्यांना वारीसाठी परवानगी द्यावी, या मागणीला समर्थन देत सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास संभाजी भिडे कºहाडातील दत्त चौकात आले. त्यावेळी त्यांच्यासह शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या ७० ते ८० धारकऱ्यांनी बंद असलेले साईबाबा मंदीर उघडून आत बसले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत परवागनी न घेता जमाव जमवून रॅली काढली. यावेळी रॅलीत सहभागी धारकऱ्यांनी विना मास्क शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचा भगवा झेंडा हातात घेवून दत्त चौक ते प्रशासकीय इमारत येथे घोषणाबाजी करत पायी चालत जात तहसिलदार यांना निवेदन दिले. यावेळीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लघंन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Case filed against 80 including Sambhaji Bhide for violating norms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.