Satara Accident: सडावाघापूरजवळ रिलसाठी स्टंट शूट करताना गाडी दरीत कोसळली! (Watch Video)
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:35 IST2025-07-10T13:34:12+5:302025-07-10T13:35:07+5:30
Satara Reel Stunt Accident Video: स्थानिकांच्या तप्तरतेने एकाचा जीव वाचला

छाया-नीलेश साळुंखे
Car Stunt Accident: सडावाघापूर (ता. पाटण) परिसरात पर्यटकांची सध्या जोरदार रेलचेल सुरू आहे. सडावाघापूरला जाताना टेबल पाॅइंटवरती गाडी खोल दरीत कोसळून एकजण गंभीर जखमी झालेला आहे. मंगेश तुकाराम जाधव (रा. म्हावशी) हा बकरी चारण्यासाठी गेला असता आवाज आला आणि त्याने घटनास्थळी पोहोचला दरीतून गाडीचा दरवाजा तोडून अडकलेल्या व्यक्तीस बाहेर काढले.
सडावाघापूर येथे जात असताना टेबल पाॅइंटवर अनेक पर्यटक फोटो शूट व करमणुकीसाठी थांबतात. बुधवार, दि. ९ रोजी सायंकाळी चारच्या दरम्यान साहिल अनिल जाधव (वय २०, रा. गोळेश्वर, ता. कऱ्हाड, जि. सातारा) हे आपल्या मित्रांसमावेत फिरण्यासाठी आले होते. सोबतचे मित्र फोटो काढण्यात मग्न होते. दरम्यान, गाडीमध्ये साहिल जाधव होते. गाडीला ब्रेक लागला नसल्याने व गवतावरून गाडी घसरत गेल्याने ही गाडी खोल दरीत कोसळली.
साताऱ्यात स्टंटबाजी करताना कार दरीत कोसळली; एकाला वाचवलं#Satara#Accidentpic.twitter.com/TA0pbsWm3c
— Lokmat (@lokmat) July 10, 2025
यावेळी उपस्थित नागरिकांना आरडाओरडा करत प्रशासनाशी संपर्क साधला. घटनास्थळी विकास संकपाळ, अमित जाधव, पाटण पोलिस ठाण्याचे अधिकारी अविनाश कवठेकर, जय घाडगे, संकेत घाडगे, टेबल पाॅइंटचे मालक परिसरातील नागरिक यांनी प्रयत्न केले व जखमी व्यक्तीस उपचारासाठी सह्याद्री हाॅस्पिटल कऱ्हाड याठिकाणी पाठवण्यात आले.