Satara: आंबेनळी घाटात कार ४०० फूट दरीत कोसळली; पाच जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 14:30 IST2026-03-13T14:30:16+5:302026-03-13T14:30:27+5:30
महाबळेश्वर (जि.सातारा) : पोलादपूर-महाबळेश्वर-वाई-सुरूर राज्य मार्गावरील आंबेनळी घाटातील बावली टोक परिसरात वाहनावरील ताबा सुटून कार थेट ३०० ते ४०० ...

Satara: आंबेनळी घाटात कार ४०० फूट दरीत कोसळली; पाच जखमी
महाबळेश्वर (जि.सातारा) : पोलादपूर-महाबळेश्वर-वाई-सुरूर राज्य मार्गावरील आंबेनळी घाटातील बावली टोक परिसरात वाहनावरील ताबा सुटून कार थेट ३०० ते ४०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत कारमधील पाच प्रवासी जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी पहाटे साडेपाच वाजता घडली. अजय सुनील संकपाळ, तुकाराम संकपाळ, सुनील संकपाळ, पार्थ संकपाळ व संगीता संकपाळ अशी जखमींची नावे आहेत.
सातारा जिल्ह्यातील लाखवड (ता.महाबळेश्वर) येथील काही ग्रामस्थ मुंबईहून आपल्या गावी परतत होते. पहाटेच्या सुमारास आंबेनळी घाटातील बावली टोक-चिरेखिंड दरम्यान वाहनाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन थेट खोल दरीत कोसळली. घाटातील हा भाग अत्यंत धोकादायक असल्याने वाहन ३०० ते ४०० फूट खोल दरीत जाऊन अडकले.
अपघाताची माहिती मिळताच, प्रतापगड सर्च ॲन्ड रेस्क्यू टीमचे संकेत सावंत आणि ऋषिकेश जाधव यांनी तातडीने इतर सदस्यांना संपर्क साधत बचाव कार्य सुरू केले. जखमींनाही सुरक्षितरीत्या वर आणण्यात टीमला यश आले.