धबधब्यात कोसळून कारचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 14:31 IST2019-08-04T14:30:23+5:302019-08-04T14:31:33+5:30
गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे साताऱ्यात कामरगावातील पाबळनाला धबधबा पात्रात कार कोसळून शनिवारी भीषण अपघात झाला.

धबधब्यात कोसळून कारचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू
कोयनानगर : गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे साताऱ्यात कामरगावातील पाबळनाला धबधबा पात्रात कार कोसळून शनिवारी भीषण अपघात झाला. पावसामुळे कार चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे अपघात झाल्याचे समजते.
या अपघातात चालक नितीन शेलारचा जागीच मृत्यू झाला. तसेच गाडीत नितीनसह अजून एक प्रवाशी असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून त्याचा शोधकार्य सुरु केले आहे.
तसेच सध्या सुरु असलेल्या मुसळदार पावसामुळे आणि धबधब्यातील पाण्याचा प्रवाह जास्त वेगाने वाहत असल्यामुळे शोधकार्यास अडथळा निर्माण होत आहे.
अपघात झालेले व्यक्ती पुण्याहून कामानिमित्त आले होते. तसेच ते सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश भावकट्टी यांनी दिली.