satara accident news: उरुल घाटात अपघात, ..अन् कार खोल दरीत कोसळताना वाचली; तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 17:59 IST2023-01-07T17:58:41+5:302023-01-07T17:59:45+5:30
सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही

satara accident news: उरुल घाटात अपघात, ..अन् कार खोल दरीत कोसळताना वाचली; तिघे जखमी
राजेंद्र लोंढे
मल्हारपेठ : पाटण-उंब्रज मार्गावर उरुल घाटात पाटणहून उंब्रज दिशेने निघालेल्या कारला आज, शनिवारी सकाळच्या सुमारास कट्याला धडकून अपघात झाला. कठड्याला गाडी अडकल्याने खाली खोल दरीत कोसळताना बचावली. या अपघातात कृष्णा शिंदे, विजय महादर, सुरेश चव्हाण हे प्रवासी किरकोळ जखमी झाले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पाटण-उंब्रज मार्गावर उरुल घाटात शनिवारी सकाळच्या सुमारास उंब्रजकडे निघालेल्या कार (एमएच ५० एल ०६६७) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे कार कठड्याला धडकली. यामध्ये कृष्णा शिंदे, विजय महादर, सुरेश चव्हाण हे जखमी झाले. जखमींना कऱ्हाड रुग्णालयात हलविले आहे.
या मार्गावर सकाळच्या सुमारास वाहनाची गर्दी नव्हती. दरम्यान, गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने कार घाटाच्या कठड्यावर गेली. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. यात गाडीचे नुकसान झाले. अपघाताची माहिती कळताच निसरे फाटा येथील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. जखमी झालेल्यांमध्ये पाटण येथील बँकेतील अधिकारी व्यापाऱ्यांचा समावेश आहे.