साताऱ्यात कारची काच फोडून सव्वा लाखाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 11:32 IST2018-08-24T11:27:22+5:302018-08-24T11:32:05+5:30

विसावा नाका परिसरात लावलेल्या महागड्या कारची काच फोडून चोरट्यांनी १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

The burst of car glass in Satara, theft of millions of rupees | साताऱ्यात कारची काच फोडून सव्वा लाखाची चोरी

साताऱ्यात कारची काच फोडून सव्वा लाखाची चोरी

ठळक मुद्देसाताऱ्यात कारची काच फोडून सव्वा लाखाची चोरीपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा : विसावा नाका परिसरात लावलेल्या महागड्या कारची काच फोडून चोरट्यांनी १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, श्रीकांत भाऊसाहेब पवार (वय ४८, कूपर कॉलनी, सदरबझार) यांनी आपली कार (एमएच ११ बीबी ९०९१) जिल्हा परिषद चौकात लावली होती. ते जीममध्ये गेले असता चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडली.

कारमधील ७० हजार रुपयांची रोकड, ५० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल व लेदर बॅग असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. याप्रकरणी रात्री उशिरा सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास श्रीकृष्ण पोरे करीत आहेत.

Web Title: The burst of car glass in Satara, theft of millions of rupees