शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदरासाठी महामार्गावर जाळपोळ!

By admin | Updated: November 27, 2015 00:43 IST

‘बळिराजा’चे मालखेडनजीक आंदोलन : टायर, लाकडे पेटविली; दोन्ही लेनवरील वाहतूक अडीच तास ठप्प

कऱ्हाड : ऊसदरासाठी बळिराजा शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, गुरुवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास जमावाने कऱ्हाड तालुक्यातील मालखेडजवळ महामार्गावर गनिमी काव्याने रास्ता रोको आंदोलन केले. टायर व लाकडी ओंडके पेटवून महामार्ग रोखून धरला. यामुळे दोन्ही लेनवरील वाहतूक रात्री सुमारे साडेनऊ वाजेपर्यंत ठप्प होती. अचानक झालेल्या या आंदोलनानंतर कऱ्हाडात जादा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आल्याचे समजते. रात्री उशिरा पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली. या ठिणगीमुळे ऊसदराचे आंदोलन भडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला तरी ऊसदराचा तिढा सुटलेला नाही. दरासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनस्तरावर चर्चेचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र, ‘एफआरपी’सह प्रतिटन साडेतीन हजार रुपये अंतिम दर मिळावा, अशी मागणी करीत गुरुवारी बळिराजा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कऱ्हाड तालुक्यात ठिकठिकाणी दुपारपासून आंदोलन सुरू केले. सायंकाळी संघटनेचे कार्यकर्ते तालुक्यातील मालखेडजवळ महामार्गावर जमले. जोरदार घोषणाबाजी करीत त्यांनी महामार्ग रोखला. जमाव आक्रमक झाल्याचे निदर्शनास येताच या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील कर्मचाऱ्यांसह मालखेडला रवाना झाले. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच जमावाने महामार्गावर टायर, गवत व लाकडी ओंडके पेटवून दिले. यामुळे अनेक वाहनचालक आपली वाहने तेथेच सोडून सुरक्षित ठिकाणी पळाले. आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी महामार्गावरील पेटते टायर, लाकडी ओंडके व गवत हटविण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. (प्रतिनिधी)राज्यमार्गांवरही गस्त कऱ्हाड शहरसह तालुका, तळबीड, उंब्रज पोलीस ठाण्यांतील सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने महामार्गावर गस्त वाढविण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. महामार्गासह कऱ्हाड-तासगाव राज्यमार्ग, कऱ्हाड-पाटण राज्यमार्ग, कऱ्हाड -ढेबेवाडी मार्ग, कऱ्हाड- मसूर मार्गासह तालुक्यातील सर्व प्रमुख मार्गावर गस्त सुरू करण्यात आली आहे. चालू साखरेच्या दराप्रमाणे एकरकमी ‘एफआरपी’ देणे शक्य असताना राज्य शासन कारखानदारांना पाठीशी घालत आहे. उसाचे उत्पादन घटल्यामुळे साखरेचे दर भविष्यात वाढणार आहेत. परिणामी, साडेतीन हजार दर देणे शक्य होणार आहे; मात्र सरकार व कारखानदार ‘एफआरपी’वर थांबल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यासाठी ‘एफआरपी’ची अट काढून उत्पादनखर्चावर आधारित साडेतीन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत. तसे न झाल्यास संघटना राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.- पंजाबराव पाटील,केंद्रीय अध्यक्ष, बळिराजा संघटनाचालू साखरेच्या दराप्रमाणे एकरकमी ‘एफआरपी’ देणे शक्य असताना राज्य शासन कारखानदारांना पाठीशी घालत आहे. उसाचे उत्पादन घटल्यामुळे साखरेचे दर भविष्यात वाढणार आहेत. परिणामी, साडेतीन हजार दर देणे शक्य होणार आहे; मात्र सरकार व कारखानदार ‘एफआरपी’वर थांबल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यासाठी ‘एफआरपी’ची अट काढून उत्पादनखर्चावर आधारित साडेतीन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत. तसे न झाल्यास संघटना राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.- पंजाबराव पाटील,केंद्रीय अध्यक्ष, बळिराजा संघटना