देऊर येथे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST2021-06-16T04:51:34+5:302021-06-16T04:51:34+5:30

वाठार पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तात्रय नानासाहेब कदम (रा. देऊर) व त्यांचे नातेवाईक यांनी सोमवार दि. १४ रोजी ...

Burglary at Deor | देऊर येथे घरफोडी

देऊर येथे घरफोडी

वाठार पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तात्रय नानासाहेब कदम (रा. देऊर) व त्यांचे नातेवाईक यांनी सोमवार दि. १४ रोजी रात्री घरामध्ये आंबे पिकायला घालून रात्री दीडच्या सुमारास घराच्या पाठीमागील दरवाजाला कडी न लावताच झोपी गेले. त्यानंतर कुणीतरी अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास मागील दाराने घरात प्रवेश करून अडीच तोळे वजनाचे सोन्याचे तीन पदरी गंठण, साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे पट्टीचे गोल आकाराचे झुमके, दीड तोळे वजनाची सोन्याची साखळी, एक तोळे वजनाचे सोन्याचे कानातील फुले, अर्धा तोळे वजनाचे सोन्याची कर्णफुले, अर्ध्या तोळ्याची चौकोनी सोन्याची अंगठी, असा एकूण ३ लाख ९० हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल घोंगडे तपास करीत आहेत.

Web Title: Burglary at Deor