शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
2
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
3
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
4
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
5
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
6
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
7
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
8
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
9
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
10
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
11
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
15
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
16
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
17
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
18
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
19
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
20
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस मदत केंद्राचे भाग्य उजळले

By admin | Updated: December 5, 2014 23:17 IST

पोलिस कर्मचारी नेमणुकीमुळे वाहनधारकांमध्ये समाधान--लोकमतचादणका

पिंपोडे बुद्रुक : सातारा, लोणंद, पुणे या राज्यमार्गावर वाठारस्टेशनजवळ आदर्की फाट्यावर असणाऱ्या पोलीस मदत केंद्रांची दुरवस्था झाली होती. मात्र, वाठारस्टेशनचे नव्याने पदभार स्विकारलेले सहायक पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांनी तातडीने कार्यवाही करून केंद्र इमारतीची डागडुजी करून त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यामुळे वाहनधारकांबरोबरच व्यवसायिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
याबाबतचे वृत्त असे की, वाठारस्टेशन पासून साधारण अडीच किलोमीटर अंतरावर आदर्की फाटा असून त्या ठिकाणी तत्कालिन जिल्हा पोलीस प्रमुख मीरा बोरवणकर यांच्या हस्ते २३ फेब्रुवारी १९९९ साली पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही वर्षाचा अपवाद वगळता हे मदत केंद्र नेहमी बंद अवस्थेतच असायचे.
सातारा, लोणंद, पुणे हा राज्यमार्ग असल्यामुळे या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहतुक होत असते. राष्ट्रीय महामार्गावरील टोल चुकविण्यासाठी या मार्गाचा परराज्यातील वाहतूक करणारी वाहने वापर करतात. वाठार स्टेशन पासून पुढे गेल्यावर सालपे घाट लागतो. या घाटात दुचाकी स्वार आणि वाहतुक विरळ असताना एखाद्या चार चाकी वाहणांस अडवून लुटन्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.
या अडचणीपाहून ‘लोकमत’मध्ये ‘पोलिस मदत केंद्र पोलिसांच्या प्रतिक्षेत’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या वृत्ताची दखल घेऊन सहायक पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांनी तातडीने केंद्र इमारतीची डागडुजी करून त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. (वार्ताहर)