Satara: पुणे-बंगलोर महामार्गावर शिंदेवाडी येथे पुलाचे काम, वाहतूक मार्गामध्ये बदल; नवा मार्ग कोणता...जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 16:47 IST2023-12-06T16:47:06+5:302023-12-06T16:47:40+5:30

मुराद पटेल शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिदेंवाडी गावच्या हद्दीतील शिदेंवाडी फाटा येथे पुलाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. यामुळे ...

Bridge work at Shindewadi on Pune-Bangalore highway, change in traffic route | Satara: पुणे-बंगलोर महामार्गावर शिंदेवाडी येथे पुलाचे काम, वाहतूक मार्गामध्ये बदल; नवा मार्ग कोणता...जाणून घ्या

Satara: पुणे-बंगलोर महामार्गावर शिंदेवाडी येथे पुलाचे काम, वाहतूक मार्गामध्ये बदल; नवा मार्ग कोणता...जाणून घ्या

मुराद पटेल

शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिदेंवाडी गावच्या हद्दीतील शिदेंवाडी फाटा येथे पुलाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. यामुळे या वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आल्याची माहिती सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली. याबाबतची अधिसुचना पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून काढण्यात आली आहे.  

राष्ट्रीय महामार्गावरील सातारा बाजूकडून पुणे बाजूकडे जाण्याकरीता असणारी वाहतूक शिदेंवाडी फाटा येथील सर्व्हिस रस्त्यावरुन वळविण्यात आली आहे. भोर बाजूकडून सातारा बाजूकडे येणा-या वाहनांकरीता शिदेंवाडी फाटा येथून सर्व्हिस रस्त्याने पुणे जिल्ह्यातील सारोळा पुलाखालून परत सातारा बाजूकडे, पुण्याहून साताऱ्याकडे येणा-या वाहनांची वाहतूक ही शिदेंवाडी फाटा येथील सर्व्हिस रस्त्यावरुन, पुणे बाजूकडील वाहतूक ही सारोळा पुलाखालून शिदेंवाडी फाटा सर्व्हिस रस्त्यावरुन शिरवळ येथील फाट्यावरील पुलावरून परत शिदेंवाडी फाटा येथून भोर बाजूकडे वळविण्यात आली आहे.

वाहतूक मार्गातील हा बदल पुलाचे काम होईपर्यंत राहणार आहे. तरी नागरिकांनी व वाहनधारकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी व वाहनधारकांनी गैरसोय टाळण्याकरीता प्रशासनाकडून करण्यात आलेल्या बदलानुसार प्रवास करावा असे आवाहन शिरवळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी केले आहे.

Web Title: Bridge work at Shindewadi on Pune-Bangalore highway, change in traffic route